महाराष्ट्र शिक्षण मंडळाने मार्च एप्रिल 2023 मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर केला आहे. तुम्ही बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर निकाल पाहू शकता.राज्याचा बारावीचा विभागनुसार निकाल बोर्डाकडून जाहीर केला. राज्याचा या वर्षीचा निकाल ९१. २५ % एवढा लागला आहे.
बारावीचा निकाल बोर्डाने जाहीर केला असून तरी सर्व विद्यार्थ्यांना दुपारी दोन वाजता ऑनलाईन पध्दतीने निकाल पाहता येणार आहे. तसेच या वर्षी राज्याचा निकाल91.25 % लागलेला आहे. या वर्षीची बाजी कोकण विभागाने मारली . कोकण विभागात सर्वात जास्त निकाल 96.01% लागलेला आहे. मुंबई विभागाचा सर्वात कमी निकाल लागला आहे. 88.13 % इतका मुंबई विभागाचा निकाल आहे . 93 % इतके दिव्यांग श्रेणीतील विद्यार्थी पास झाले आहे.
या वर्षी 14 लाख 16 हजार 371 विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसले होते . त्यातील 12 लाख 92 हजार 468 इतके विद्यार्थी परिक्षेत पास झाले आहेत.मुलींनी या वर्षीच्या निकालात बाजी मारली आहे , मुलींच्या उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 93.73 % इतके आहे.तर या वर्षी 89.14 % इतके मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण आहे. . 4.59 टक्के इतके मुलीचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण मुलांपेक्षा जास्त आहे.
26 मे पासून गुण पडताळणीसाठी अर्ज करता येणार.
निकाल जाहीर झाल्याच्यानंतर विद्यार्थ्यांना आवश्यक विषयातील गुण तपासण्यासाठी ऑनलाइन पद्धतीचा अवलंब करू शकता . त्यांना त्यांच्या चाचण्या पुन्हा तपासायच्या असतील, तर ते त्यांच्या उत्तरांची डिजिटल प्रत त्या विषयाच्या प्रभारी मंडळाकडे पुनर्मूल्यांकनासाठी पाठवू शकतात. http://verification.mhehsc.ac.in या वेब साईड ला जाऊन स्वत: अर्ज करून किंवा महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
विभाग निहाय निकाल
मुंबई – ८८.१३ टक्के
कोल्हापूर – ९३.२८ टक्के
लातूर – ९०.३७ टक्के
कोकण – ९६.०१ टक्के
नागपूर – ९०.३५ टक्के
छ. संभाजीनगर – ९१.८५ टक्के
अमरावती – ९२.७५ टक्के
नाशिक – ९१.६६ टक्के
पुणे – ९३.३४ टक्के