राहुरी कृषी विद्यापीठाने देशपातळीवर केले १८ नवीन वाण प्रसारित ,कोणते आहेत ते जाणून घ्या सविस्तर ..

महात्मा फुले कृषी विद्यापीठाने संशोधित केलेल्या विविध पिकांच्या अठरा वाणांना नवी दिल्ली मधील कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या भारत सरकारच्या गॅझेटमध्ये अधिसूचित केले आहे.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनाला या निमित्ताने यश प्राप्त झाले आहे. राज्यातील कृषी विद्यापीठांपैकी राहुरी कृषी विद्यापीठाचे राष्ट्रीय पातळीवर सर्वात जास्त वाण प्रसारित झाले आहेत.

प्रसारित केलेल्या पिकांचे वाण

🔰भात – फुले कोलम
🔰मका – फुले उमेद व फुले चॅम्पियन
🔰ज्वारी – फुले पूर्वा
🔰करडई – फुले भूमी
🔰तूर – फुले पल्लवी
🔰टोमॅटो – फुले केसरी
🔰चेरी टोमॅटो – फुले जयश्री
🔰घोसाळे – फुले कोमल
🔰वाल – फुले सुवर्ण
🔰मेथी – फुले कस्तुरी
🔰मूग – फुले सुवर्ण
🔰उडीद – फुले राजन
🔰राजमा – फुले विराज
🔰 ऊस – फुले १५०१२
🔰 घेवडा – फुले श्रावणी
🔰गहू – फुले अनुराग
🔰कापूस – फुले शुभ्रा

महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे सर्वांत जास्त वाण सन २०२४ या वर्षात राष्ट्रीय पातळीवर प्रसारित झाले आहेत. ही फार मोठी गौरवाची बाब विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या दृष्टीने आहे. शेतकरीभिमुख संशोधन विद्यापीठाचे शास्त्रज्ञ करीत आहेत. – डॉ. पी. जी. पाटील, कुलगुरू, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *