महाराष्ट्रातला शेतकरी पारंपारिक शेती बरोबर फळबाग लागवडीकडे सुद्धा अधिक लक्ष देऊ लागला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सेंद्रिय पद्धतीने पिकणाऱ्या फळांना आजकाल आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणावर मागणी आहे . हे लक्षात घेऊन निमगावच्या शेतकऱ्यांने अवघ्या तीन एकरात डाळिंबाची लागवड करत डाळिंब थेट दुबईच्या मार्केटमध्ये विकत तब्बल 52 लाख रुपयांची कमाई केली आहे.
डाळिंबाची विक्री थेट दुबईच्या मार्केटमध्ये..
तीन एकरात केसर जातीच्या डाळिंबाची 1300 रोपे निमगावच्या नागनाथ शिंदे आणि बंडू शिंदे या दोघांनी लावली.यंदा या दोन्ही शेतकऱ्यांनी प्रति एकर चार ट्रेलर शेणखत देत सेंद्रिय पद्धतीने लागवड केलेल्या झाडांवरून वीस किलो डाळिंबाचे उत्पन्न घेतले . दुबईच्या मार्केटमध्ये 200 ते 400 ग्रॅम वजनाचे एक डाळिंब हातोहात विकले जात आहे .
या पद्धतीने केले नियोजन ..
सेंद्रिय खत वापरत पाण्याचे नियोजन त्यांनी डाळींब झाडांचं संरक्षण करण्यासाठी केले. तसेच डाळिंब शेतीत गांडूळ खताचा वापर देखील त्यांनी या वर्षी केला. यामुळेच डाळिंबाचं वजन वाढवून गोडवा ही वाढला. झाडांचे गोगलगाय इत्यादींपासून संरक्षण करण्यासाठी त्यांनी एकरी 6 किलो गांडुळे टाकली. यामुळे जमिनीची सुपीकता आणि गांडुळांची संख्या वाढली.एका झाडाला सरासरी 20 किलो डाळिंबाचे उत्पादन घेत दुबईला निर्यात केल्याचं ते सांगतात. तसेच बागेतील तुषार व गंज रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी त्यांनी विशेष खबरदारी घेतली .
३० टन डाळिंबाची निर्यात..
या शेतकऱ्याला तीन एकर डाळिंबासाठी 7.5 लाखांचा खर्च आला. यंदा त्यांची कमाई 52 लाखांची आहे. या शेतकऱ्यांनी 30 टन डाळिंबाची निर्यात तीन एकरात केली आहे. या शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार अडीच लाख रुपये प्रति एकर खर्च आल्याचे शेतकरी सांगतात .त्यांच्याकडे डाळिंबाचे व्यापारी स्वत: आले आणि 180 रुपये किलो दराने डाळिंब खरेदी करून दुबईला निर्यात केली असे त्यांनी यावेळी सांगितले.