आता नारळाची शेती ठरत आहे वन टाइम इन्व्हेस्टमेंट , जास्त उत्पादनासह खर्च कमी …

सौंदर्यप्रसाधने, शोभेच्या वस्तू ,स्वयंपाकात , औषधे, यामध्ये नारळाचा उपयोग केला जातो.नारळ पाणी, खोबरे, खोबऱ्याचे तेल, नारळाचे दूध, सालापासून कोको पावडर, करवंटीपासून शोभेच्या वस्तू, झाडाच्या पानांपासून खराटा, चटई,टोपल्या, छत विणण्यासाठी उपयोग केला जातो. थोडक्यात नारळाच्या झाडाची ‘नारळ एक फायदे अनेक’ अशी व्याख्या करता येईल.

एकदा रोपासाठी खर्च केल्यावर ५० वर्षे झाडाला कोणतीही अडचण येत नाही.अनेक अर्थाने फायद्याच्या असलेल्या नारळाची शेती शेतकऱ्यांसाठी सध्या ‘वन टाइम इन्व्हेस्टमेंट’ ठरत आहे. खतपाण्याशिवाय फक्त पाण्यावर नारळाचे झाड राहते. झाड चार वर्षांनंतर परिपक्व होते. त्यानंतर मोहर येतो, फुले येतात आणि झाडाला नारळ लागतात.एक झाड सरासरी २०० नारळ देते. नारळाची सोललेली सालीची देखील जागेवर विक्री होत असल्याने उत्पन्न चांगले मिळते. शहाळ्याचा उपयोग झाला नाही तरी, नारळाचे वय झाले की झाडावरून नारळ आपोआप गळून पडतात. ही प्रक्रिया सलग सुरू असल्याने शेतकऱ्यांसाठी नारळाचे झाड म्हणजे फिक्स डिपॉझिट!

नारळाची सोललेली साल कुटी मशिनमध्ये टाकल्यावर त्यापासून कोको पावडर बनते. ती कोको पावडर शेतात टाकली जाते वा शेणखतात मिक्स केल्यावर शेतात खत म्हणून वापरली जाते.शेतकऱ्यांचा तणनाशकाचा खर्च आपोआप वाचतो. त्यामुळे शेतात गवत उगवत नाही. पूर्वी एक नारळ १५ रुपयांना विकला जात होता. आता २० रुपयांना दिला जातो.

लागवडीसाठी जमीन :

जमिनी विषयी बोलायचे झाले तर कोणत्याही जमिनीची निवड नारळ लागवडीसाठी आपण करू शकता ,फक्त आपल्याला पाण्याची उपलब्धता पाहिजे , कारण जमीन हलकी असली तरी चालेल परंतु पाणी भरपूर असले पाहिजे .

जमिनीची ट्रॅक्टर च्या साह्याने नारळ लागवडीपूर्वी चांगली खोल पूर्व मशागत करून घ्यावी ,व १ एकरमध्ये 12 बाय 15 असे अंतर ठेऊन खड्डे खोदून घ्यावे व आपल्याकडे शेण खत वैगेरे जे असेल खड्ड्यात टाकून घ्यावे ,नारळ लागवडी अगोदर निंबोळी पेंड आणि बुरशीनाशक टाकून खड्डे व्यवस्थित भरून घ्यावे .

लागवडीसाठी कलम :

कलम आपण घरी सुद्धा तयार करू शकता परंतु नर्सरी मधून कलम घेतल्यास खात्रीशीर कलम आपणास मिळू शकते , तसेच कलम खात्रीशीर असल्यास उत्पन्न देखील चांगले मिळते .

नारळाच्या जाती : नारळाच्या सुधारित जातीमध्ये ठेंगू जाती व उंच वाढणाऱ्या जाती असे दोन प्रकार असतात . त्यापैकी

नारळाच्या ठेंगु जातीमध्ये
1. चौघाट ऑरेंज डॉर्फ,
2. मलायन ग्रीन डॉर्फ ,
3. चौघाट ग्रीन डॉर्फ,
4. मलायन येलोडॉर्फ व गंगाबोडम या 4 जाती महत्त्वाच्या आहेत.

उंच वाढणाऱ्या जातीमध्ये..
1.प्रताप, वेस्ट कोस्ट टोल
बानवली,
2. लक्षदीप मायको,
3. फिलिपिन्स ऑर्डिनरी
4. केरा बस्तर,
5. लक्षदीप ऑर्डिनरी (चंद्र कल्प), या 6 जाती महत्त्वाच्या आहेत.

चौघाट ग्रीन डॉर्फ :केरळ राज्यातील त्रिचूर जिल्ह्यात चौघाटामध्ये ही जात पहिल्यादा आढळली. या जातीस ३ ते ४ वर्षानंतर फळधारणा होते. प्रति वर्ष 30 ते 160 नारळ प्रति झाडापासून मिळतात. यामध्ये तेलाचे प्रमाण 72 टक्के असते.यामध्ये खोबर्‍याचे प्रमाण 38 ते 100 ग्रॅम आहे. सरासरी 60 ग्रॅम खोबरे एका नारळापासून मिळते.

१ एकर मध्ये झाडांची संख्या :

एक एकर जमिनीमध्ये नारळाची 250 झाडे बसतात . 12 बाय 15 फुटावर लागवड केली तर. शेतकरी आपल्या अनुसार वेगवेगळे अंतर ठेवतात परंतु नारळ झाडांमध्ये योग्य आंतर असणे आवश्यक आहे , अंतर कमी असेल तर झाडे एकमेकांत घुसू शकतात , त्यामुळे 12 बाय 15 अंतर हे ठराविक अंतर ठेवावे .

खत व्यवस्थापन : शेण खत तसेच सेंद्रिय खत दिल्यास उत्पन्नात अवश्य भर पडेल. रासायनिक खत देण्याची नारळाच्या झाडांना गरज नसते .

पानी व्यवस्थापन :

कोणत्याही पिकासाठी पानी हा अतिशय महत्वाचा घटक आहे , आणि विशेष करून इतर पिकांपेक्षा नारळ या पिकासाठी पाण्याची गरज जरा जास्तच असावी लागते , त्यासाठी आपण वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करू शकता जसे की शेततळे , विहीर,कॅनल , इत्यादि . चा वापर करू शकता नारळ झाडाच्या बाजूला सरी तयार करून सरी पद्धतीने पाणी देऊ शकता , ठिबक सिंचन प्रणालीचा देखील वापर करू शकता . नारळ शेतीसाठी पाण्याचा योग्य आणि काटेकोर वापर केल्यास आज शेतकरी कमी पाण्यात सुद्धा नारळ शेती यशस्वी पणे करत आहेत .

नारळापासून एकरी उत्पन्न :

१ एकर जमिनीमध्ये नारळाची 250 झाडे बसतात 12 बाय 15 फुटावर लागवड करावी . एक झाडाला एक वर्षात सरासरी 300 ते 500 नारळ लागतात मात्र कमीत कमी वर्षाला एक झाडाला एक झाडाला 100 नारळ पकडले आणि एका नारळ 50 ते 60 रुपये भाव मिळतो मात्र प्रती नारळ 20 रुपये प्रमाणे आपण भाव पकडला तरी

100×250 = 25000 नारळ

25000× 20 = 500000 पाच लाख रुपये

म्हणजे आपण नारळ लागवडीमधून एका एकरात 5 लाख रुपये उत्पन्न कमीत कमी मेहनतीमध्ये घेऊ शकतो .

आंतर पीक :

१. मधमाशी पालन : मध माशांचे बॉक्स आपण नारळ बागेमध्ये ठेऊ शकता आणि मधमाशी पालन करू शकता ,
२ . भाजीपाला : नारळ बागेमध्ये आपण भाजीपाला वर्गीय पिके घेऊ शकता ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *