शासन निर्णय ! आता शेतकऱ्यांना मिळणार ‘इतक्या’ हेक्टरपर्यंत नुकसान भरपाई ,जाणून घ्या सविस्तर ..

आपल्या राज्यामध्ये अनेकदा गारपीट अतिवृष्टी, पूर, अशा नैसर्गिक आपत्तीमुळे आपल्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असते . या नुकसानीमुळे आपले आर्थिक गणित कोलमडते . परंतु आता राज्य सरकारने या नुकसानीची भरपाई मिळवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

काय आहे हा निर्णय?
शेतकऱ्यांना आतापर्यंत नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास केवळ २ हेक्टर जमिनीपर्यंतच मदत दिली जात होती. परंतु आता शेतकऱ्यांना या मर्यादेत वाढ करून ३ हेक्टरपर्यंत मदत देण्यात येणार आहे . आता जास्तीत जास्त शेतकरी या योजनेचा लाभ घेतील आणि त्यांना अधिक नुकसान भरपाई मिळेल.

कशी मिळेल ही मदत?

शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत थेट त्यांच्या बँक खात्यात मदत जमा करण्यात येणार आहे . त्यामुळे नुकसान भरपाईचे पैसे मिळण्यासाठी शेतकऱ्यांना कार्यालयांचे हेलपाटे मारावे लागणार नाही.

कोण कोणत्या आपत्तींसाठी मदत मिळणार ?

आपत्ती व्यवस्थापन विभागाने निश्चित केलेल्या १२ नैसर्गिक आपत्तींसह, अवेळी पाऊस, वीज कोसळणे, समुद्राचे उधाण आणि आकस्मिक आग गारपीट, यासारख्या स्थानिक आपत्तींमध्ये बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांनाही ही मदत मिळणार आहे .

शेतकऱ्यांना मिळणार दिलासा

◼️ नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीची आर्थिक भरपाई होईल.

◼️ आर्थिक स्थिरता: शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल .

◼️ शेतकऱ्यांच्या हिताचा राज्य सरकारचा हा निर्णय आहे.

◼️कृषी क्षेत्राला चालना: शेतकरी नुकसानीची भीती न बाळगता शेती करण्यासाठी प्रोत्साहित होतील.

◼️ शेतकरी बांधवांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

◼️ या योजनेचा लाभ आपण सर्वांनी घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *