आता सातबारा उताऱ्यावर आईचेही नाव,६ महिन्यांत होणार सुविधा सुरू…

विविध सरकारी कागदपत्रांमध्ये आईच्या नावाचा उल्लेख करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता त्यानंतर आता भूमी अभिलेख विभागाने आईच्या नावाचा समावेश सातबारा उताऱ्यावरही अर्जदाराच्या नावानंतर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . त्यामुळे आता सातबारा उताऱ्यावर १ मे २०२४ नंतर जन्मलेल्या व्यक्तीच्या नावे जमीन खरेदीनंतर अर्जदारासह आईच्या नावाचा उल्लेख करण्यात येणार आहे . आता संगणकप्रणालीत बदल करण्याची प्रक्रिया भूमी अभिलेख विभागामार्फत सुरू करण्यात आली आहे. येत्या सहा महिन्यांमध्ये त्यांचे काम सुरू होणार आहे.

महिला व बालकल्याण विभागाने काही महिन्या अगोदर आईच्या नावाचा समावेश करण्याचा निर्णय घेतला होता . सातबारावर हि सुविधा राबविण्याचा निर्णय त्याच भूमी अभिलेख विभागामार्फत घेतला आला आहे. . “१ मे २०२४  नंतर जन्माला आलेल्या व्यक्तीचे संपूर्ण रेकॉर्ड तयार करण्यासाठी काही वर्षांचा वेळ जातो. परंतु , आईच्या नावाचा समावेश सध्याच्या व्यक्तींच्या नावासोबत करण्यासाठी आईच्या नावाचा नवा रकाना तयार करण्यात येणार आहे.असे भूमी अभिलेख विभागातील ई फेरफार प्रकल्पाच्या राज्य संचालक सरिता नरके म्हणाल्या,त्याबाबत संगणकप्रणालीत तसे बदल करण्यात येणार आहेत.या सर्व प्रक्रियेला किमान तीन ते सहा महिने लागू शकतात . त्यामुळे येत्या सहा महिन्यात जुन्या व्यक्तींच्या नावासोबत आईच्या नावाचा समावेश करणे शक्य होणार आहे.. हा पुरावा सादर केल्यानंतर त्या व्यक्तीच्या नावासोबत आईचे नाव लावण्यात येईल . त्या संदर्भातील पुरावे जमा केल्यानंतर त्याची तलाठ्यामार्फत शहानिशा केल्यानंतरच नोंद होणार आहे.”

विवाहित स्त्रियांच्या बाबतीत दरम्यान,सध्या अस्तित्वात असलेल्या पद्धतीनुसार, त्यांच्या लग्नानंतर तिचे नाव यानंतर तिच्या नवऱ्याचे नाव आणि आडनाव अशा पद्धतीने नाव नोंदविण्याची प्रक्रिया आहे.तसेच मालमत्तेच्या दस्तऐवजामध्ये महिलेलाला विवाहापूर्वीच्या नावाने नाव नोंदविण्याची मुभा राहील, असेही त्यांनी यावेळी माहिती दिली .

१ मे २०२४ नंतर जन्माला आलेल्या व्यक्तीच्या सातबाऱ्यावर आईच्या नावाचा समावेश करताना आपोआप पुरावे असतील. तसेच १ मे २०२४ पूर्वी जन्माला आलेल्या व्यक्तीने आईच्या नावाचा समावेश करणे हे बंधनकारक होणार आहे . या साठी संबंधित महिला त्याची आई असल्याचा पुरावा सादर करावा लागतो . पुरावा पाहूनच त्या व्यक्तीच्या नावापुढे आईचे नाव लावण्यात येते. – सरिता नरके, राज्य प्रकल्प संचालक ई फेरफार प्रकल्प

Leave a Reply