दस्त नोंदणीच्या वेळी सातबारा उताऱ्यावरील सर्व खातेदारांचे मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी माहिती ”आय – सरिता” प्रणालीमध्ये पब्लिक डेटा एन्ट्री पीडीई नोंदविण्याची सुविधा भूमी अभिलेख आणि नोंदणी विभागाने उपलब्ध करून दिली आहे.
या सुविधेमुळे संबंधित जमिनीची खरेदी विक्री, वारस नोंद, बोजा आदीबाबत होणाऱ्या नोंदणीची माहिती खातेदाराला एसएमएस आणि ईमेलच्या माध्यमातून समजणार आहे . तसेच जमिनीचे परस्पर होणाऱ्या व्यवहारांमुळे जमीन मालकाची फसवणूक रोखणे शक्य होणार आहे.
मागील काही वर्षापासून जमिनींना सोन्याचे भाव आले आहेत.
त्यामुळे जमीन व्यवहारांमध्ये फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. बोगस व्यक्तींना उभे करून जमिनीचे दस्त केल्याचे प्रकार घडतात. दस्त नोंदणी होऊन सातबारा उताऱ्यावर दुसऱ्या व्यक्तीचे नाव आल्यानंतर जमीन मालकाला फसवणूक झाल्याचे कळते.
त्याचबरोबर सातबारा उताऱ्यावर बोजा चढवणे. परस्पर गहाण खत करणे , आधी फसवणुकीचे प्रकार उघडकीस आले आहेत. असे प्रकार टाळण्यासाठी जमीन खरेदी विक्री ची माहिती संबंधित जमीन मालकाला समजण्यासाठी महसूल विभागाने ही सुविधा दिली आहे.
त्यानुसार संबंधित सातबारा उताऱ्यावरील सर्व खातेदारांचा मोबाईल क्रमांक ची माहिती दस्त नोंदणी पीडीई मध्ये नोंदवली जाते . या माहितीच्या आधारे दस्त नोंदणी झाल्यानंतर इंडेक्स 2 तयार झाल्यावर तलाठ्यांकडे हा दस्त नोंदवीत या फेरफार नोटीस ची माहिती या सर्व खातेदारांना एसएमएसच्या आधारे दिली जाते.
जर सातबारा उताऱ्यावरील एखाद्या खातेदारांची हरकत असेल तो, तलाठी अथवा मंडळ अधिकाऱ्यांकडे देऊ शकतो . अनेक वेळा दस्त नोंदणी वेळी पीडीई मध्ये जमीन खरेदी करणारा आणि विक्री करणाऱ्यांची मोबाईल नंबर दिलेले असतात.
तर मात्र इतर खातेदारांची मोबाईल नंबर न देणे अथवा दुसऱ्या व्यक्तीचे देणे किंवा चुकीचा मोबाईल नंबर टाकणे आधी प्रकार होत आहेत. त्यामुळे सुविधेचा वापर योग्य पद्धतीने झाल्यास संबंधित सातबारा वरील खरेदी विक्री तसेच इतर व्यवहारांची सर्व खातेदारांना माहिती मिळेल अशी माहिती अधिकाऱ्यांच्या वतीने देण्यात आली सातबारा उतारे शी मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी लिंक करण्याची प्रणाली विकसित करण्यात आली आहे. परंतु अनेकदा दस्त नोंदणी पूर्वी पब्लिक डेटा एन्ट्री करताना खरेदी दारात व विक्रेता दोघेही स्वतःचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी देत नाही त्यामुळे सातबारा उतारावरील प्रत्येक बदलायची माहिती एसएमएस च्या माध्यमातून मिळण्यापासून खातेदार वंचित राहतात या सुविधेचा लाभ खातेदारांनी घ्यावा सरिता नरके अतिरिक्त जिल्हाधिकारी भूमी अभिलेख विभाग.
नोटीस ची माहिती मोबाईलवर.
एखाद्या व्यक्तीने जर जमीन खरेदी करण्याचा दस्त नोंदवल्यानंतर तो दस्त तलाठी कार्यालयाकडे आल्यावर तलाठी सातबारा उताऱ्यावरील इतर खातेदारांना नोटीस बजावतात पोस्टद्वारे नोटीस पाठवण्यात येत असल्याने नोटीस मिळण्यास कधी कधी उशीर होतो. एखाद्या व्यक्ती जर बाहेरच्या जिल्ह्यात अथवा परदेशात राहत असल्यास त्या व्यक्तीला नोटीस वेळेत पोहोचत नाही. यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.