kanda bajarbhav : देशात कांदा आवक वाढली; महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक; मध्यप्रदेशात घट..

Kanda bajaebhav : मागील आठवड्यात कांदा बाजारभाव घसरण झाल्याचे दिसून आले, याचे कारण म्हणजे आषाढी एकादशीनंतर राज्यात वाढलेली आवक. देशातील कांद्याची बाजारातील आवक ६ ते १२ जुलै २०२५ या आठवड्यात मागील आठवड्याच्या तुलनेत काहीशी वाढलेली दिसून आली आहे. २९ जून ते ५ जुलै या आठवड्यात देशभरात एकूण २९७७१२.९८ मेट्रिक टन कांदा बाजारात आला होता. त्यानंतर ६ ते १२ जुलै या दुसऱ्या आठवड्यात ही आवक ३०१७०७.८६ मेट्रिक टन झाली. याचा अर्थ एका आठवड्यात देशात ३९९४.८८ मेट्रिक टनांनी कांदा अधिक बाजारात दाखल झाला आहे.

या आठवड्यांतर्गत राज्यवार तुलना केली असता, महाराष्ट्राची कांदा आवक मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. २९ जून ते ५ जुलैदरम्यान महाराष्ट्रातून १,३३,९८२.४५ मेट्रिक टन, तर ६ ते १२ जुलै दरम्यान १,५७,८५०.८५ मेट्रिक टन कांदा बाजारात आला, म्हणजेच २३,८६८.४० मेट्रिक टनांनी वाढ झाली.

गुजरातमध्ये मात्र घट झाली असून, पहिल्या आठवड्यातील १६६३९.१४ मेट्रिक टन कांद्याच्या तुलनेत दुसऱ्या आठवड्यात केवळ १२७३७.५५ मेट्रिक टन कांदा बाजारात दाखल झाला. मध्यप्रदेशमध्ये देखील कांद्याची आवक घसरली आहे. पहिल्या आठवड्यात ६६१४७.३१ मेट्रिक टन, तर दुसऱ्या आठवड्यात ५७६७८.१३ मेट्रिक टन कांदा आला आहे.

कर्नाटक, पंजाब, हरियाणा, दिल्ली या राज्यांमध्ये देखील आठवड्याच्या तुलनेत कांद्याची आवक कमी झाली आहे. कर्नाटकमध्ये सुमारे ११०६ मेट्रिक टनांनी, दिल्लीमध्ये १५४३ मेट्रिक टनांनी, हरियाणामध्ये २३९ मेट्रिक टनांनी, तर पंजाबमध्ये सुमारे २८३ मेट्रिक टनांनी घट झाली.

याउलट आंध्रप्रदेश, बिहार, छत्तीसगड, जम्मू-काश्मीर, राजस्थान, तेलंगणा आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये कांद्याची आवक वाढलेली दिसते. विशेषतः बिहारमध्ये जवळपास ६८ मेट्रिक टनांची, तर छत्तीसगडमध्ये १७६ मेट्रिक टनांची वाढ झाली.

सर्व राज्यांच्या आकडेवारीनुसार, ६ ते १२ जुलै २०२५ या आठवड्यात देशातील एकूण कांदा आवक ३.२ लाख मेट्रिक टनांच्या आसपास होती, जी बाजाराच्या दृष्टीने तुलनेत सध्या स्थिर मानली जात आहे.