नाशिक जिल्ह्यामधील कांदा व्यापाऱ्यांनी 20 सप्टेंबर सकाळपासून बंद पुकारल्याने कांद्याचे व्यवहार बंद पडले आहेत. व्यापाऱ्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याने कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.
बंदमध्ये सहभागी होणाऱ्या व्यापाऱ्यांचे परवाने आणि गाळे जप्त होणार आहेत. ही कारवाई बाजार समितीला करावी लागणार आहे, ही कारवाई न केल्यास बाजार समिती संचालक मंडळ आणि सचिवांवर राज्य सरकारच्या पणन खात्याकडून कारवाई करण्यात येणार आहे.
बाजार समिती ना 21 सप्टेंबर दुपारी बारा वाजेपर्यंत कारवाईचा अहवाल राज्य सरकारला सादर करायचा होता. दरम्यान कांदा प्रश्नावर नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी दुपारी बारा वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये व्यापारी प्रतिनिधी आणि बाजार समिती प्रतिनिधी जिल्हा उपनिबंधक यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
लालसगाव बाजारपेठेत शुकशुकाट..
दररोज सकाळी नऊ वाजल्यापासून कांद्याचे लिलाव लालसगाव बाजार समितीमध्ये सुरू होतात. त्यामुळे कोट्यावधी रुपयांची उलाढाल सुरू असते. परंतु आज लालसगाव सह सर्व बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट आहे. पालकमंत्री दादा भुसे यांची तातडीची बैठक बोलवण्यात आली आहे . या बैठकीमध्ये व्यापारी असोसिएशन नाफेडचे अधिकारी त्याचबरोबर जिल्हा उपनिर्बंधक यासह बाजार समिती संचालक मंडळ तसेच त्यांच्या प्रतिनिधींना देखील आमंत्रित करण्यात आले आहे.
मंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यापाऱ्यांना थेट इशारा देत म्हणाले विविध कारणे देऊन व्यापारी लीला बंद ठेवल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे लिलाव बंद ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करणार असल्याचे पणल मंत्री सत्तर यांनी यावेळी सांगितले . सध्या गणपती आगमनाने सणासुदीचा काळ असून या काळात लिलाव बंद ठेवणे अयोग्य आहे . जे व्यापारी लिलाव बंद ठेवतील त्यांच्यावर कडक कारवाई करावी. असे आदेश देखील पणन आयुक्त व नाशिक जिल्हाधिकारी यांनी दिले असल्याचे यावेळी सत्तार त्यांनी सांगितले.
जोपर्यंत व्यापार करणे परवडत नाही . तोपर्यंत बाजार समितीतील लिलावात सहभागी न होण्याचे निर्णय नाशिक जिल्हा कांदा व्यापारी संघटनेने घेतला आहे . त्यामुळे लालसगाव या मुख्य बाजार समितीचे अनेक बाजारा समित्यांमध्ये शुकशुकट पाहण्यास मिळत आहे . दरम्यान कांदा लिलाव बंद असल्याने शेतकरी कांदा लिलावासाठी बाजार समितीमध्ये येत नसल्याचे दिसून येत आहे. पुन्हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर संकट आल्याचे दिसून येत आहे. व्यापाऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी पणन मंत्र्यांनी 25 सप्टेंबर रोजी संघटनेला चर्चेसाठी बोलवण्यात आले आहे.