रेशीम शेती उद्योगात तुती लागवड करताना तुतीच्या ‘या’ सुधारित जातींची आत्ताच लागवड करा..

तुतीची पाने ही रेशीम कीटकांचे एकमेव खाद्य आहे . रेशीम उद्योगामध्ये तुतीच्या पानांचे महत्व मोठे आहे, कारण पानांच्या गुणवत्तेचा आणि प्रमाणाचा थेट परिणाम कोष उत्पादनावर होतो. त्यामुळे दर्जेदार तुती पाला नियमितपणे उपलब्ध करणे गरजेचे आहे.

महाराष्ट्रासह दक्षिण भारतात रेशीम कीटकांच्या संगोपनासाठी विविध तुतीच्या जातींची शिफारस केली आहे . यामध्ये
व्हिक्टरी-१ (V-1),
१. एस-३६(S-36),
२. जी-४ (G-4),
३. जी-२ (G-2)
आणि एजीबी ८ (AGB8) या सुधारित जातींचा समावेश आहे.

या जाती उच्च उत्पादन क्षमता आणि गुणवत्तेसाठी प्रसिद्ध आहेत, त्यामुळे रेशीम उत्पादनामध्ये वाढ होऊ शकते. योग्य लागवड आणि व्यवस्थापनामुळे या जातींचा उपयोग रेशीम उद्योगाच्या विकासासाठी केला जातो .

🔰 एस – ३६
– बाल्य रेशीम अळी (चॉकी) साठी उपयुक्त.
– पौष्टिक पाने, साधा हिरवट झाड.
– राखाडी गुलाबी खोड, मध्यम फांद्या.
– ४०-४२ हजार किलो प्रति हेक्टरी उत्पादन, मुळ फुटण्याचे प्रमाण ४८%.
– चकचकीत, गुळगुळीत पाने, मोठ्या बोटीच्या आकाराची.

🔰 व्हिक्टरी – १
– केंद्रीय रेशीम संस्थानाने विकसित.
– उच्च मुळधारण क्षमता आणि जलद वाढ.
– प्रौढ रेशीम अळ्यांसाठी योग्य, महाराष्ट्रात लोकप्रिय.
– सरळ, जाड, रसरशीत पाने.

🔰 एजीबी ८ (AGB८)
– संकरित जात, अर्ध-शुष्क प्रदेशासाठी.
– हेक्टरी ४७ मेट्रिक टन पानांचे उत्पादन.
– उच्च मूळ धारण क्षमता, जाड गडद हिरवी पाने, ताठ शाखा,

🔰 जी-२
– उच्च उत्पादन देणारी जात, चॉकीसाठी योग्य.
– व्ही-१ पेक्षा २०%, एस-३६ पेक्षा ३३%, जास्त उत्पादन
– प्रति हेक्टरी ३८ मेट्रिक टन उत्पादन.
.

🔰 जी-४
– प्रति हेक्टरी ६५ मेट्रिक टन उत्पादन.
– जाड, गडद हिरवी, चकचकीत पाने, ताठ फांद्या.
– सुधारित जात, प्रौढ अळ्यांसाठी योग्य.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *