महाराष्ट्र राज्य हे फलोत्पादनात पिकांच्या लागवड आणि उत्पादनात अग्रेसर आहे. भौगोलिक हवामानामुळे नाशिक जिल्ह्यात डाळीव फळपिकासाठी पोपक जमीन आणि वातावरण असल्यामुळे नाशिक जिल्हा डाळींब उत्पादनासाठी प्रसिद्ध असून डाळींब पिकाचे निर्यातक्षम उत्पादन घेतले जाते. नाशिक जिल्ह्यात डाळींब पिकाखालील क्षेत्र ३० हजार ते ३५ हजार हेक्टर आहे. मागील २ वर्षापासून डाळींव फळपिकास सरासरी रु. १०० प्रति किलो याप्रमाणे भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांचा डाळींब पिक लागवडीकडे कल वाढत आहे.
तसेच, भौगोलिक हवामानामुळे बीड जिल्ह्यात सिताफळ फळपिकासाठी आवश्यक जमीन आणि वातावरण असल्यामुळे बीड जिल्हा सिताफळ उत्पादनासाठी विशेष प्रसिद्ध असून सिताफळ पिकाचे निर्यातक्षम उत्पादन घेतले जाते. बीड जिल्हा परिसर व बालाघाट डोंगररांगात सिताफळ पिकाखालील क्षेत्र सुमारे ३० हजार हेक्टर आहे. मागील २ वर्षापासून सिताफळ फळपिकास सरासरी रु. ६० प्रति किलो याप्रमाणे भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांचा सिताफळ पिक लागवडीकडे कल वाढत आहे. तसेच सिताफळ पिकाचा उत्पादित माल विक्री तसेच प्रक्रियेकरिता वीड जिल्ह्याबाहेर मोठ्या प्रमाणात पाठविला जातो. त्यामुळे सिताफळ उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होत आहे.
नाशिकच्या दृष्टीने महत्त्वाच्या डाळींव फळपिकाचे तसेच बीड च्या दृष्टिने महत्वाच्या सिताफळ पिकचे शाश्वत उत्पादन, प्रक्रिया तसेच निर्यातीसाठीचे क्लस्टर निर्माण करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यादृष्टीने एकाच छताखाली डाळींव/सिताफळ उत्पादक शेतकऱ्यांना सर्व सुविधा उपलब्ध होण्यासाठी नाशिक जिल्ह्यात डाळींब इस्टेट व बीड जिल्ह्यात सिताफळ इस्टेट स्थापन करण्यास मा. मंत्रिमंडळाच्या दिनांक ३० सप्टेंबर, २०२४ रोजीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यानुसार पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे.
सदर शासन निर्णय खालील लिंक वरती उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202410091818511801.pdf