उष्णतेपासून करा पिकांचा बचाव, वापरा केओलीन…

प्रामुख्याने केओलिनचा वापर शेतीमध्ये बाष्परोधक म्हणून केला जातो . केओलिन हे इतर बाष्परोधकांच्या तुलनेमध्ये जास्त परिणामकारक असून . वजनाने हलक्या असलेल्या विशिष्ट दगडापासून केओलिनचे उत्पादन तयार करण्यात येते .

कच्च्या केओलिनवर ५५० ते ६०० अंश सेल्सिअस तापमानामध्ये प्रक्रिया करण्यात येते असते . यानंतर त्यावर निर्जंतुकरणाची प्रक्रिया केली जाते व त्यातील विषारी घटक वेगळे करण्यात येतात . अशा रीतीने जनावरांच्या औषधात, पशुखाद्यात शुद्ध स्वरूपातील केओलिन वापरण्यात येते .पिकांना बाजारात उपलब्ध असलेले कच्चे केओलिन हे हानिकारक ठरते. कारण यामध्ये अर्सेनिक ,लीड, यासारखे विषारी घटक असतात.

प्रकाशाची तीव्रता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जास्त प्रमाणात वाढलेली असते. उन्हाळ्यामध्ये जमिनीवरून उष्ण वारे वाहण्याचे प्रमाणही अधिक असते. त्याचा पिकांवर परिणाम होतो. उन्हाळ्यामध्ये पिकांवर पुढील लक्षणे दिसतात .अन्नद्रव्यांचा पुरवठा कमी होणे, फळांवर काळे डाग पडणे (यालाच सनबर्न असे म्हणतात), पिकाची वाढ खुंटणे, पाने करपणे,

उन्हाळ्यामध्ये पाण्याची सगळीकडे कमतरता असते. तसेच बाष्पोत्सर्जनाद्वारे पिकाला दिलेले पाणी उडून जाते. त्यामुळे पिके लवकर सुकतात . केळीची पाने फेब्रुवारी महिन्यानंतर वेगवान वारे आणि उष्ण लाटा यामुळे फाटतात, करपतात. द्राक्ष, डाळिंब, आंबा,ड्रॅगनफ्रूट, संत्री, कलिंगड इत्यादी फळांवर काळे डाग पडतात. या दिवसामध्ये फळांची प्रत व दर्जा यावर अनिष्ट परिणाम होत असतो .

केओलिनचे कार्य काय आहे ?

पानांवरील प्रखर सूर्यप्रकाश वातावरणात परावर्तित करणे :

– पिकाच्या पानांवर पातळ पांढरा थर तसेच फळांवर केओलिनची फवारणी केल्यानंतर तयार होतो. तीव्र सूर्यकिरणे पानांत किंवा फळांत जाऊ न देता तो हा पांढऱ्या रंगाचा थर वातावरणात परावर्तित करतो. त्यामुळे ३ ते ४ अंश सेल्सिअसने पानांतील पेशीद्रवाचे तापमान बाह्य वातावरणातील तापमानापेक्षा कमी राहण्यास मदत होते.

– पानांमधून होणारे बाष्पोत्सर्जन हे २५ ते ३० टक्क्यांनी केरोलीनमुळे कमी होण्यास मदत होते .

– फोटोसिन्थेसिस ही क्रिया सुलभ होते. त्यामुळे पेशी विभाजन सुद्धा वाढते.

केओलिन मुळे पर्णछिद्रांची उघडझाप मर्यादित ठेवण्यास मदत :

उन्हाळ्यामध्ये तापमान वाढेल तशी पानांवरील पर्णछिद्रांची उघडझाप कमी जास्त होत असते . तापमानामध्ये वाढ झाली असता पूर्ण छिद्रे बंद होत असतात आणि तापमान कमी झाले की ती पुन्हा छिद्रे उघडतात.

कीड-रोगांना प्रतिबंध :

केओलिनचा वापर केल्यानंतर पानांवर एक विशिष्ट प्रकारचा थर तयार होत असतो .संरक्षक कवच म्हणून हा थर पानाच्या आतील पेशी भोवती काम करतो यामुळे अनेक रसशोषक कीटकाचा रसशोषण करण्यास प्रतिबंध होतो. त्यामुळे अनेक रोगांचा प्रसार होण्यापासून प्रतिबंध होतो . केओलिनचा वापर केल्यामुळे पिकांचे रोग व किडींपासूनही संरक्षण होते.

वापराचे प्रमाण :

प्रामुख्याने फवारणीद्वारे केओलिनचा वापर केला जातो.केओलिन फवारणीसाठी ५ ते १० ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात वापण्यात येते. केओलिनची फवारणी पिकांवर उन्हाळ्यामध्ये कमीत कमी १० ते १५ दिवसांच्या अंतराने करणे आवश्यक आहे.

संशोधनातील निष्कर्ष :

भारतीय कृषी संशोधन संस्था नवी दिल्ली मधील डॉ. शर्मा व डॉ. दत्ता या संशोधकांनी केलेल्या संशोधनानुसार केओलिनची डाळिंबावर दर १५ दिवसांनी ५ वेळा फवारणी केली असता सनबर्न ४७ टक्क्यांनी कमी झाले आहे . तसेच फळे तडकण्याचे प्रमाण देखील या फवारणीमुळे ४६ टक्क्यांनी कमी झाले आहे. याशिवाय फळाचा रंग व चकाकी येण्याचे प्रमाण १९.५ टक्क्यांनी वाढले आहे ,फळातील रसाचे प्रमाण १६.२ टक्क्यांनी वाढले. तसेच फळमाशीचा प्रादुर्भाव ५०.३ टक्क्यांनी कमी झाला , बॅक्टरीयल ब्लाइटचा प्रादुर्भाव ४०.२ टक्क्यांनी कमी झाला आहे असे यांच्या संशोधनातुन दिसून आले.

.डॅनिश व बनीड्रो पोर्तुगीज संशोधक यांनी द्राक्ष पिकावर केओलिन वापरून संशोधन केले असता ,केओलिन मुळे एकूण फेनॉलमध्ये ४० टक्क्यांनी वाढ झाली असे दिसून आले. तसेच अॅन्थोसायनिन ३२ टक्के, व्हिटॅमिन सी १२ टक्के,तर फ्लेनॉइड्सचे प्रमाण २४ टक्के, नी या मध्ये वाढ झाल्याचे संशोधनातं समोर आले.

मुलतान कृषी विद्यापीठातील पाकिस्तानमधील संशोधक मोहम्मद नाजीम यांनी कापूस पिकावर केओलिनचा वापर केला त्यानंतर उत्पादनामध्ये १२.८ टक्क्यांनी वाढ झाल्याचे संशोधनात समोर आले.१०० पीपीएमने जस्मोनिक अॅसिडचे प्रमाण वाढण्यास मदत झाली आहे.

केओलिनचा वापर उन्हाळ्यामध्ये वरील संशोधनाच्या निष्कर्षावरूनकरणे गरजेचा आहे. हे दिसून येते. याशिवाय इतर हवामान स्थितीतही सर्वच पिकांवर याचा वापर फायदेशीर ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे . केओलिनचा वापर पिकांवरती केल्यामुळे मधमाशी तसेच इतर उपयुक्त कीटकांना हानिकारक होत नाही .केओलिन हे पर्यावरणपूरक आहे.
डॉ. शिवाजी थोरात, ९८५००८५८११

(सदस्य -इंटरनॅशनल सोसायटी फॉर सिलिकॉन इन अॅग्रीकल्चर, लॉस एंजलिस-अमेरिका)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *