
महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांनी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित केलेले खरीप कांदा बियाणे फुले बसवंत- ७८० आणि फुले समर्थ या वाणांची दि. २१ मे २०२४ पासून विक्री करण्यासाठी सुरुवात केली आहे.
महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे प्रमूख शास्त्रज्ञ (बियाणे) डॉ. आनंद सोळंके यांनी सदर कांदा बियाणांची विक्री विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील विविध ठिकाणी करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.
दरवर्षी महात्मा फुले कृषि विद्यापीठाने विकसीत केलेल्या फुले बसवंत-७८० आणि फुले समर्थ या कांद्याच्या वाणांना मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांकडून मागणी असते.
कुठे मिळणार बियाणे ..
1) कृषि संशोधन केंद्र, निफाड, जि. नाशिक
2) कृषि महाविद्यालय, मालेगाव, जि. नाशिक
3) कृषि संशोधन केंद्र, चास, जि. अहमदनगर
४) कृषि संशोधन केंद्र, बोरगाव, जि. सातारा
5) कृषि संशोन केंद्र, लखमापुर
6) कृषि महाविद्यालय, हाळगाव तालुका :- जामखेड, जिल्हा :- अहमदनगर या ठिकाणी या वाणांची विक्री सुरु करण्यात येणार आहे.
7) कृषि महाविद्यालय, पुणे
8) कांदा, लसूण व द्राक्ष संशोधन केंद्र, पिंपळगाव बसवंत, जिल्हा नाशिक
9) कृषि विज्ञान केंद्र, धुळे
प्रति किलो रु. १५०० प्रमाणे शेतकरी बांधवांना सदरचे कांदा बियाणे त्यांच्या जिल्ह्यामध्येच विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. याचा लाभ सर्व शेतकर्यांनी घ्यावा असे आवाहन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे प्रमूख शास्त्रज्ञ (बियाणे) डॉ. आनंद सोळंके यांच्याकडून करण्यात आले आहे.