स्वयंरोजगारासाठी उत्तम पर्याय, हायटेक नर्सरी संबंधित अनुदानाची माहिती जाणून घ्या सविस्तर ..

आता नर्सरी उद्योगाला शेतीची गरज ओळखून चांगलीच गती मिळाली आहे. शेतकऱ्यांना नवनवीन बियाणे नर्सरी मधून वापरून दर्जेदार रोपे मिळू लागली आहेत. जसा शेतकऱ्यांना याचा फायदा होत आहे तसा नर्सरी चालकांना ही होत आहे.पारंपरिक पद्धतीत अडकलेला हा उद्योग आता अधिक सक्षम रोपे,नवीन तंत्रज्ञान, उत्तम गुणवत्तेची रोपे देऊन आधुनिक ते कडे वाटचाल करू लागला आहे.

रोपवाटिकेची गरज..

प्रत्येकाला आपल्या नोकरीसह आज काल एखादा जोड व्यवसाय असावा असे वाटत असते . आपल्याला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचे अनेक पर्याय मिळतील ज्यापैकी एक नर्सरी व्यवसाय सुद्धा आहे. महाराष्ट्र आणि इतर राज्यातून रोजगार हमी योजना, फळबाग लागवड योजना, औषधी वनस्पती वृद्धी योजना, वृक्ष लागवड योजना, यासारख्या योजना राबवण्यात येत असता .क्षारयुक्त जमिनीचे लागवड, कोरडवाहू फळ पिके, डोंगर उतारावर लागवड, यामध्ये वाढ होत आहे आणि यामुळे रोपवाटिकेची आवश्यकता वाढत चाललेली आहे .

रोपवाटिका प्रस्थापित करताना..

1) मातृ वृक्ष
2) कोणत्या प्रकारची रोपवाटिका प्रस्थापित करावयाची आहे?
3) किती कलमे रोपे उत्पादित करावयाची आहे?
4) कलम लोकांना हार्डनिंग करणे.
5) खुंटू रोपे वाढविण्यास जागा
6) किती जमीन हवी आहे?
7) पाणी
8) रोपवाटिकेसाठी मजुरांची उपलब्धता कशी आहे?

पिकांची अभिवृद्धी करण्यासाठी लागणारे खुंट रोपे

1) चिकू – खिरणी
2) लिंबूवर्गीय फळे – जंबेरी, रंगपुर लाईम
3) पेरू – सफेदा, फ्लोरिडा
4) द्राक्ष – डॉगरीज
5) आंबा – गोवा, बेल्लरी, ओलर, चंद्रकरन

महत्वाच्या पिकांची अभिवृद्धी पद्धत..

1) आंबा – कोई कलम, शेंडा कलम
2) चिकू – भेटकलम, दाब कलम
3) केळी – मुनवे, कंद
4) द्राक्षे – डोळे भरणे, फाटे कलम
5) पपई, नारळ, सुपारी – बियांपासून
6) पेरू – दाब कलम,
7) सर्व भाजीपाला – बियांपासून

रोपवाटिका संबंधित अनुदानाची माहिती
प्रकल्प किमतीच्या २०% अनुदान कर्जाची संलग्न अनुदान रुपये २५ लक्ष पर्यंत चार हेक्टर क्षेत्रासाठी.

एकात्मिक बागवानी विकास अभियान – रुपये २५ लक्ष हेक्टरी असा खर्च चार हेक्टर क्षेत्राच्या हायटेक नर्सरी साठी अपेक्षित धरून प्रकल्प किमतीच्या ४० टक्के अनुदान देण्यात येते . प्रति रोपवाटिका जास्तीत जास्त अनुदान रुपये चाळीस लक्ष. मुख्य अट प्रति वर्ष हेक्टरी कमीत कमी ५० हजार कलमे तयार करणे गरजेचे आहे.

लघु रोपवाटिका – १५ लाख रुपये प्रति हेक्टर असा १ हेक्टर क्षेत्रासाठी खर्च अपेक्षित आहे आणि त्यासाठी प्रति रोपवाटिका कमीत कमी रुपये साडेसात लाख असे अनुदान देण्यात येते . मुख्य अट प्रति वर्ष हेक्टरी कमीत कमी २५००० कलमी तयार करणे गरजेचे आहे.

रोपवाटिकेचे आधुनिकीकरण करण्यासाठीच्या अनुदान
चार हेक्टर क्षेत्रासाठी रुपये दहा लक्ष पर्यंत अनुदान दिले जाते खाजगी रोपवाटिका धाराकासाठी पन्नास टक्के म्हणजेच चार हेक्टर क्षेत्रासाठी रुपये पाच लक्ष पर्यंत अनुदान देण्यात येते .

यामध्ये खालील गोष्टीकडे लक्ष द्यायला हवे.

◼️ रोपवाटिकेची व्यवस्थापन मागणी नुसार पुरवठा, रोग किडींचे नियंत्रण विक्री पश्चात सेवा, मार्केटिंग. नर्सरी टाकण्याअगोदर कोणत्या भागामध्ये कोणते पीक मोठ्या प्रमाणात घेण्यात येते ,तिथे कोणत्या प्रकारची फळझाडे व भाजीपाला पिके आहेत याचा विचार करून नर्सरीची उभारणी करायला पाहिजे उदाहरणार्थ. कोकणात आंबे,काजू ,कोकम, नारळ, सुपारी, यांच्या रोपवाटिका पाहिजेत, पश्चिम महाराष्ट्रामध्ये बोर् ,डाळिंब ,मोसंबी, लिंबू ,विदर्भात संत्रा, मराठवाड्यात संत्रा मोसंबी ,केळी असे त्या त्या भागामध्ये त्या त्या जातीच्या फळांच्या रोपवाटिका असल्यामुळे वाहतुकीचा खर्च कमी होण्यास मदत होते .

◼️रोपांचे संगोपन करायला प्रशिक्षित माणसाची नियुक्ती करावी,रोपवाटिका शास्त्र शुद्ध पद्धतीची असावी एक चांगले शेड हाऊस किंवा ग्रीन हाऊस उभारून त्याला चांगल्या प्रकारचा मीडिया वापरून प्लास्टिकच्या ट्रेमध्ये बियाण्यांची उगवण करावी , शेड हाऊस आणि ग्रीन हाऊस मध्ये बियाण्यांची उगम शक्ती अधिक होते .

◼️ त्यामध्ये वायुविजन नियंत्रित करता येत असल्याने रोपांची वाढ चांगली आणि निरोगी होण्यास मदत होते . कलम किंवा बियाणे उगवण्यासाठी गादी वाफेवर टाकल्यास मातीमधील जिवाणू वर त्यावर येऊ शकतात त्यामुळे नंतर उत्पादन कमी होऊ शकते. त्यामुळे कोकोपीट वापरून ट्रे मध्ये रोपे किंवा कलमे तयार करावीत.

◼️ एकदा रोपे तयार झाल्यानंतर शेतकऱ्यांकडे रोपे व्यवस्थित रित्या पोहोचतील याची व्यवस्था करणे आवश्यक आहे कारण त्यामध्ये रोपांना हानी पोहचू शकते शेतकऱ्यांना रोपे विक्री केल्या नंतर त्या शेतकऱ्याने ती कशी लावायची खतांचे पाण्याचे नियोजन इत्यादी सर्व गोष्टींची माहिती वेळोवेळी शेतकऱ्यांना नर्सरी चालकांनी दिल्या पाहिजेत . यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होते व रोपवाटिकाचे नाव होते.

◼️ आता नर्सरी उद्योगात जैवतंत्रज्ञान शास्त्रामुळे क्रांती झाली आहे . चांगल्या प्रतीच्या हजारो रोपे उती संवर्धन तंत्रज्ञान वापरून तयार करून त्याचे गुणवत्ता गुणधर्म अबाधित ठेवून रोपे तयार करतात.

 रोपवाटिकेची मार्केटिंग कशी कराल.. 

कुठला व्यवसाय करताना त्याची योग्य पद्धतीने मार्केटिंग होणे जास्त महत्वाचे आहे . मुख्य रस्त्यापासून जवळच असणारी जागा जेणेकरून ग्राहकांची गैरसोय होणार नाही अशी जागा निवडावी . ऑनलाइन पद्धतीने वेबसाईट दवारे तुम्ही मार्केटिंग करू शकता , तुम्ही डिजिटल मार्केटिंगचा उपयोग करून घरपोच सेवा देखील पोचू शकता . तुमच्याकडे उपलब्ध असणाऱ्या रोपांची त्यांच्या जातीची माहिती आसपासच्या गावांमध्ये जाऊन देऊन मार्केटिंग करू शकता . निरोगी व गुणवत्तापूर्वक रोपांना बाजारात नेहमीच किंमत आणि मागणी असते.

Leave a Reply