Onion rate : २ जानेवारीला लाल कांद्याच्या दरात तेजी; प्रमुख बाजारपेठांमध्ये शेतकऱ्यांना दिलासा…

Onion rate : २०२५ हे वर्ष कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत हालाखीचे ठरले असून संपूर्ण वर्षभर बाजारभावातून अपेक्षित दिलासा मिळू शकला नाही. सातत्याने कमी दर, वाढलेला उत्पादन खर्च आणि अनिश्चित बाजारस्थिती यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले. आता २०२६ या नव्या वर्षात तरी कांदा बाजारातून दिलासा मिळतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 ०२ जानेवारी २०२६ रोजी, बाजारात जवळपास ०२ लाख क्विंटलहून अधिक कांद्याची आवक झाली असून, या वाढलेल्या आवकेमुळे आगामी काळातील दरांची दिशा काय राहणार, हे पाहणे शेतकऱ्यांसाठी निर्णायक ठरणार आहे.

आजच्या बाजारातील दर पाहता विविध मंड्यांमध्ये कांद्याच्या वेगवेगळ्या प्रकारांना संमिश्र भाव मिळाल्याचे चित्र आहे. उन्हाळ कांद्याला पिंपळगाव बसवंत बाजारात किमान ३०० रुपये तर सरासरी १६०० रुपये दर मिळाला असून, देवळा बाजारात सरासरी १००० रुपये, सटाणा बाजारात १३६५ रुपये आणि कळवण बाजारात १५५० रुपये भाव नोंदवला गेला. त्याचबरोबर पिंपळगाव बसवंत मार्केटमध्ये पोळ कांद्याला सरासरी १७०० रुपयांपर्यंत दर मिळाल्याने काही प्रमाणात दिलासा दिसून येतो.

लाल कांद्याच्या बाबतीत सोलापूर बाजारात १२०० रुपये, लासलगाव निफाडमध्ये १८०० रुपये, धुळे बाजारात १४०० रुपये, संगमनेरमध्ये १३०५ रुपये, परंडा बाजारात १४५० रुपये तर देवळा बाजारात १६५० रुपये दर मिळाला आहे. यासोबतच पुणे बाजारात लोकल कांद्याला सरासरी १३५० रुपयांपर्यंत भाव मिळाल्याने आगामी काळातील बाजारस्थितीकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
03/01/2026
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल13150018001650
02/01/2026
कोल्हापूरक्विंटल461550022001100
अकोलाक्विंटल58060022001400
चंद्रपूर – गंजवडक्विंटल260210027002400
मुंबई – कांदा बटाटा मार्केटक्विंटल1242780023001550
खेड-चाकणक्विंटल150120020001500
दौंड-केडगावक्विंटल472730026001700
जुन्नर – नारायणगावचिंचवडक्विंटल3020018001100
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल21300100022101350
सोलापूरलालक्विंटल6769810030001200
येवलालालक्विंटल900020018411450
येवला -आंदरसूललालक्विंटल600022517611600
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल369100028001900
धुळेलालक्विंटल134060017401400
लासलगावलालक्विंटल2433660023901800
लासलगाव – निफाडलालक्विंटल228090120001800
लासलगाव – विंचूरलालक्विंटल1255560020201780
धाराशिवलालक्विंटल16100016001300
सिन्नरलालक्विंटल270050019201725
सिन्नर – नायगावलालक्विंटल12850016751500
कळवणलालक्विंटल285060020201501
संगमनेरलालक्विंटल1256520024111305
चांदवडलालक्विंटल1550060021281770
मनमाडलालक्विंटल500030020001750
सटाणालालक्विंटल367522518551475
कोपरगावलालक्विंटल146050018411500
कोपरगावलालक्विंटल644050018501610
पिंपळगाव(ब) – सायखेडालालक्विंटल197086017601450
भुसावळलालक्विंटल365001000800
नांदगावलालक्विंटल1234612118311450
वैजापूरलालक्विंटल591920021001500
परांडालालक्विंटल146475021001450
देवळालालक्विंटल550030018351650
हिंगणालालक्विंटल8140014001400
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल432550025001500
पुणेलोकलक्विंटल1747550022001350
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल7130018001550
पुणे-मांजरीलोकलक्विंटल6270016001400
पुणे-मोशीलोकलक्विंटल57050016001050
मंगळवेढालोकलक्विंटल8410016001200
कामठीलोकलक्विंटल25154020401790
कल्याणनं. १क्विंटल3180020001900
कल्याणनं. २क्विंटल3150017001600
नाशिकपोळक्विंटल237775021501800
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल1680040023001700
कळवणउन्हाळीक्विंटल100035023101550
सटाणाउन्हाळीक्विंटल156520017851305
कोपरगावउन्हाळीक्विंटल32250016461250
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल35030018261600
नांदगावउन्हाळीक्विंटल15115115511250
वैजापूरउन्हाळीक्विंटल40420017751200
देवळाउन्हाळीक्विंटल50025016001000