रासायनिक खतांवरील खर्च कमी करून वापरा प्रभावी ‘नॅनो’ खते ,वापर कसा करावा जाणून घ्या सविस्तर ..

शास्त्रीय दृष्टिकोनातून आवश्यक असणाऱ्या मूळ घटकांच्या पूर्तीसाठी रासायनिक खतांचा संतुलित वापर करून नॅनो खताचा वापर वाढवा . पिकांची उत्पादकता वाढण्यासाठी शेणखत, कंपोस्ट खत व जैविक खतांचा वापर करावा.

नॅनो खतांची फवारणी केल्यानंतर नत्र व स्फुरद झाडाच्या पानावरील, बिया व मुळाच्या पृष्ठभागावर असणाऱ्या छिद्रांच्या माध्यमातून आतमध्ये जाते व पानांच्या पेशीमधील पोकळीत साठवले जाऊन पिकांच्यागरजेनुसार झाडाला उपलब्ध होते. त्यामुळे नत्र व स्फुरद ही अन्नद्रव्ये योग्य त्या प्रमाणामध्ये विहित वेळेत पिकांना उपलब्ध होतात.

जमीन हवा व पाणी या मूलभूत घटकांना या नॅनो पद्धतीमुळे खतांचा संतुलित वापर होऊन प्रदूषण मुक्त ठेवता येते.पिकांच्या भरघोस उत्पन्नाची हमी प्राप्त होते तसेच लागवडीच्या खर्चात बचत होते , अशी कृषी विभागाने माहिती दिली .

नॅनो खताचा वापर कसा करावा?

पिकांच्या विविध अवस्थेमध्ये २ वेळा फवारणी करून नत्र व स्फुरद या अन्न घटकांची पिकांना पूर्तता करून द्यावे .पिकाच्या फुटवे/फांद्या फुटण्याच्या अवस्थेमध्ये पहिली फवारणी करावी व पिकाच्या फुलोरा/शेंगा लागण्या अगोदर सात दहा दिवस अगोदर दुसरी फवारणी करावी.यामुळे नॅनो खताचे उत्तम परिणाम दिसेल .

फवारणी सकाळच्या वेळेमध्ये कमी उन्हामध्ये आणि हवेच्या कमी वेगामध्ये करावी. नॅनो खते समप्रमाणात सर्वत्र मिसळण्यासाठी व पाने पूर्ण ओली होण्यासाठी पंपाला फ्लॅट फॅन किंवा कट नोझल लावून फवारणी करावी. नॅनो युरिया/डीएपी फवारणीद्वारे द्यावे. वाहत्या पाण्यातून व ठिबकद्वारे देऊ नये 

दोन प्रकारची खते
शेतकऱ्यांसाठी भारत सरकारने नॅनो खते नॅनो युरिया (द्रवरूप) व नॅनो डीएपी (द्रवरूप) नवीन संशोधनाद्वारे उपलब्ध करून दिलेली आहे..

नॅनो युरिया व नॅनो डीएपी द्रवरूप हे ५०० मिली पॅकिंगमध्ये असतात , नॅनो डीएपीमध्ये ८ टक्के नत्र व १६ टक्के स्फुरद एकूण वजनाच्या प्रमाणात असते.

तसेच नॅनो युरियामध्ये ४ टक्के नत्राचे प्रमाण असते पिकांना नत्र व स्फुरद हे नॅनो युरिया व डीएपीद्वारे च्या फवारणी द्वारे मिळते .

Leave a Reply