
Heavy rain : राज्यातील शेतकऱ्यांचे शेती पिक/शेतजमीन यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून, पशुहानी, मनुष्यहानी होणे, घर पडझड होणे, पुरामुळे गावातील बाधितांना स्थलांतरीत करणे या बाबत मदत देण्याबाबतची कार्यवाही करण्यात येत आहे.जिल्हास्तरीय यंत्रणेमार्फत राज्यामध्ये पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत असून त्यानुसार जून २०२५ ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत २६.६९ लाख हेक्टर क्षेत्राचे तर सप्टेंबर २०२५ या महिन्यात जवळ-जवळ ३९ लाख हेक्टर क्षेत्राचे असे राज्यामध्ये एकूण सुमारे ६५ लाख हेक्टर क्षेत्राचे शेतीपिक नुकसान झालेले आहे.
त्यामुळे राज्यातील अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे पूर्णतः अथवा अंशतः प्रभावित तालुके घोषित करण्यात आले होते. या मध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.राज्यातील विविध तालुक्यांमध्ये जून ते सप्टेंबर २०२५ या कालावधीतील अतिवृष्टी व पूर, पेरणी खालील क्षेत्र व पिकांची स्थिती या सर्व घटकांचा एकत्रित विचार करण्यात आला आहे.या घटकांनी पूर्णतः अथवा अंशतः प्रभावित झालेले तालुके खालील यादीनुसार आपत्तीग्रस्त घोषित करण्यात आले आहेत.
सदर तालुक्यातील सर्व आपदग्रस्त/बाधितांना दुष्काळ सदृष्य परिस्थितीत लागू असणाऱ्या सवलती देण्याबाबत सदर शासन निर्णयाने मान्यता देण्यात आली आहे.
सदर सवलती पुढीलप्रमाणे,
१) जमीन महसूलात सूट.
२) सहकारी कर्जाचे पुनर्गठन.
३) शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती (एक वर्षासाठी)
४) तिमाही वीज बिलात माफी.
५) परीक्षा शुल्कात माफी व १० वी आणि १२ वी च्या विद्यार्थ्यांची फी माफी.
जिल्हानिहाय तालुक्यांची यादी