कांद्यावरील ‘स्टेमफायलम करपा’रोग थांबवण्या साठी उपाय ,वाचा सविस्तर…

कांद्यावरील स्टेमफायलम करपा हा बुरशीजन्य रोग आहे.
त्यांचाविषयी :-
– भारत, अमेरिका व अन्य कांदा उत्पादक देशात आढळतो.
– रोग निर्माण करणारी बुरशी-स्टेमफायलम व्हेसीकरीयम
– अन्य यजमान पिके: लसुन, टोमॅटो, सोयाबीन, आंबा, शतावरी.
– नुकसान-सुमारे 30 ते 50 टक्के नुकसान होऊ शकते.

लक्षणे

कांदा तयार होत असताना हा रोग जास्त दिसून येतो. जुनी पाने रोगाला लवकर बळी पडतात. प्रथम पानाचा माथ्यावर पाणीदार ठिपका दिसतो.तो राखाडी रंगाचा व अंडाकार असतो.

ठिपक्यांच्या खालील व वरच्या बाजूला पिवळसर भाग दिसतो. जेव्हा बुरशीचे बीजाणू तयार होतात तेव्हा हा ठिपका काळसर दिसू लागतो . हळूहळू ठिपके पडून व संपूर्ण पान रोगग्रस्त होऊन गळू लागतात .त्यामुळे कांदा व्यवस्थित पोसत नाही व उत्पादन कमी होते. बीजोत्पादनाच्या कांद्यावरी रोग आढळतो. त्यामुळे फुलांचा दांडा पडून नुकसान होते.

रोग कसा निर्माण होतो?

बुरशी तंतूच्या स्वरूपात जमिनीतील काडी कचरा, सेंद्रिय पदार्थ, पिकांचे अवशेष, जुन्या कांदा चा ढीग यावर जिवंत किंवा सुप्तावस्थेत राहते. 80 ते 90 टक्के आद्रता व 20 ते 30 अंश से. तापमानात बुरशीचे बीजाणू अंकुरित होऊन रोगाची प्राथमिक लागण करतात. त्यानंतर पानावरील बुरशी बीजाणू निर्माण करतात. त्यास कोनिडिया म्हणतात. त्यापासून द्वितीय लागण होते.

नियंत्रण उपाय

– स्ट्रॉबिलिन गटाच्या बुरशी नाशकाप्रती प्रतिकार क्षमता या बुरशीत निर्माण झाली आहे.त्यामुळे या गटातील बुरशीनाशकाचा वापर टाळावा.
– शेतातील काडी कचरा किंवा जुन्या पिकांचे अवशेष स्वच्छ करावेत.
– लागवडीपूर्वी संपूर्ण शेतात ट्रायकोडर्माचा वापर फवारणी किंवा धुरळणी स्वरूपात किंवा शेणखतात मिसळून करावा.
– तुषार सिंचनाचा वापर शक्यतो टाळावा.
– वारंवार एकच पीक घेणे टाळावे.
– कांदा ,टोमॅटो, लसूण, सोयाबीन, आदी यजमान पिके आधी शेतात घेणे टाळावे.

शिफारस केलेली बुरशीनाशके : 

– ॲझॉक्सीस्ट्रॉबीन 18.2% अधिक डायफेनोकोनझोल११.४% एस सी (संयुक्त)
– तेब्युकोनझोल- ३८.३९% एससी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *