सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात फुले 265 ने शेतकऱ्यांना खूप पैसे मिळवून दिले होते. त्याचप्रमाणे फुले 15012 जातीचा ऊस क्रांती करणार का ? हे पहावे लागणार आहे. नुकतीच पाडेगावच्या ऊस संशोधन केंद्रातून फुले 15012 पहिली मुळी बाहेर पडली आहे.
महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव च्या मूलभूत बियाणे विक्रीचा शुभारंभ करण्यात आला आहे. सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप व मध्यवर्ती संशोधन केंद्राचे प्रमुख विशेष डॉक्टर राजेंद्र भिलारे यांच्या हस्ते सतीश काकडे , निंबूत धोंडीबा दाईगुंडे, सोलापूर, अनिल जमदाडे, वाई, नामदेव सकुंडे, वाघळवाडी या प्रगतशील शेतकऱ्यांना फुले ऊस १५०१२ या ऊस वाणाच्या बेणे मळ्यातील पहिली मोळी देऊन बियाणे विक्री व वाटपाला शुभारंभ करण्यात आला.
फुले 265 या वाणाची अधिक उत्पादन व साखर देणाऱ्या वाणाची लागवड झाल्यामुळे कारखाना ऊस पुरवठा बाबत स्वयंपूर्ण झाला. त्यामुळे कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीमुळे स्वतःच्या बंगला, ट्रॅक्टर यावर २६५ ची कृपा ‘असे नावे दिली. डॉक्टर राजेंद्र भिलारेऊस रोगशास्त्रज्ञ , डॉक्टर सुरेश नलावडे, ऊस कीटक शास्त्रज्ञ, डॉक्टर शालिग्राम गांगुर्डे , ऊस शरीर क्रियाशास्त्रज्ञ डॉ. कैलास भोईटे, सहकारी साखर कारखान्याचे संचालक जितेंद्र निगडे, मुख्य शेतकी अधिकारी बापूराव गायकवाड आणि ऊस विकास अधिकारी, विराज निंबाळकर, वरिष्ठ संशोधन सहायक डॉ. सुरेश उबाळे, डॉ. रणजितसिंह निंबाळकर, डॉ. दत्तात्रय थोरवे उपस्थित होते.
नवीन वाण वापरा
सध्याची पाणी टंचाई परिस्थिती पाहता पाडेगाव संशोधन केंद्र ने प्रसारित केलेल्या फुले ऊस १५०१२ आणि फुले ऊस १३००७ या पाण्याचा ताण सहन करणारे आणि चोपन जमिनीत अधिक उत्पादन देणाऱ्या नवीन वाणाची जास्तीत जास्त लागवड करावी असे आव्हान जगताप यांनी केले. संशोधन केंद्र आणि प्रसारित केलेली नवीन ऊस वाणाबाबत माहिती देताना डॉक्टर सुरेश उबाळे यांनी फुले ऊस १५०१२ हा उसाचा वाण को ८६०३२ पेक्षा अधिक ऊस उत्पादन व फुले २६५ पेक्षा अधिक साखर देणारा वाण आहे असे सांगितले.
बियाणे उपलब्ध होणार.
सध्या प्रामुख्याने 2022 साली या संशोधन केंद्राने महाराष्ट्रातील शिफारशीत केलेले फुले 15012 आणि राष्ट्रीय स्तरावर द्विकल्पीय उष्णकटीबंधीय प्रदेशामधील सात राज्यासाठी प्रसारित झालेली फुले 13007 या वाणाचे मोठ्या प्रमाणावर मूलभूत बियाणे मळे केंद्रामार्फत तयार केलेले आहेत. त्याचबरोबर त्याबरोबर को फुले २६५, ८६०३२, फुले १०००१. फुले १२०८२,फुले ९०५७, या वाणाचे बियाणे उपलब्ध होणार आहे. सर्व साखर कारखाने आणि शेतकन्यानी पाडेगाव ऊस संशोधन केंद्राचे बियाणे वापरण्याचे आवाहन डॉ. राजेंद्र भिलारे, ऊस विशेषज्ञ यांनी केले.