तूर पिकाचे स्थान कडधान्य पिकांमध्ये अत्यंत महत्वाचे आहे. भारतीय लोकांच्या आहारामध्ये कडधान्य पिकांचे अनन्य साधारण महत्व आहे. तसेच जमिनीची उत्पादकता व पोत कायम राखून जास्त उत्पादन मिळत राहण्यासाठी विविध पीक पध्दतीमध्ये कडधान्य पिकांना नव्याने महत्व प्राप्त होत आहे.
१) बीडीएन – २०१३-४१ (गोदावरी)
कालावधी दिवस : १६५-१७०
उत्पादन क्वि./हे. : २२-२४
वैशिष्ट्ये : शेंगाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये सिंचन देणे गरजेचे तसेच मर व वांझ रोगास प्रतिकारक, पांढरा दाणा,
२) बी एस एम आर – ७३६
कालावधी दिवस : १७५-१८०
उत्पादन क्वि./हे. : को. १४-१६, बा. १८-२०
वैशिष्ट्ये : लाल दाणा, मर व वांझ रोगास प्रतिबंधक .
३) बी डी एन – ७११
कालावधी दिवस : १५०-१५५
उत्पादन क्वि./हे. : १६-१८
वैशिष्ट्ये : कमी कालावधीमध्ये तयार होणारा, दाण्याचा रंग पांढरा , तसेच मर व वांझ रोगास प्रतिकारक.
४) बी एस एम आर – ८५३ (वैशाली)
कालावधी दिवस : १७५-१८०
उत्पादन क्वि./हे. : को. १४-१६, बा. १८-२०
वैशिष्ट्ये : लाल दाणा, मर व वांझ रोगास प्रतिबंधक .
५) बी डी एन – २
कालावधी दिवस : १५५-१६५
उत्पादन क्वि./हे. : १४-१५
वैशिष्ट्ये :गुजरात मध्ये लोकप्रिय वाण, पांढरा दाणा, मररोग प्रतिकारक .
६) बी डी एन – ७१६
कालावधी दिवस : १६५-१७०
उत्पादन क्वि./हे. : २०-२२
वैशिष्ट्ये : जास्त उत्पादन क्षमता, मर व वांझ रोगास प्रतिबंधक.
७) बी डी एन – ७०८ (अमोल)
कालावधी दिवस : १५५-१६५
उत्पादन क्वि./हे. : १४-१७
वैशिष्ट्ये : कोरडवाहुसाठी योग्य मर व वांझ रोगास प्रतिकारक, लाल दाणा .
८) फुले राजेश्वरी
कालावधी दिवस : १४०-१५०
उत्पादन क्वि./हे. : १८-२३
वैशिष्ट्ये : तांबड्या रंगाचे टपोरे दाणे, मर व वांझ रोगास प्रतिकारक, लवकर पक्वता असणारा वाण .
९) विपुला
कालावधी दिवस : १४५-१६०
उत्पादन क्वि./हे. : १४-१६
वैशिष्ट्ये : मर व वांझ रोगास प्रतिकारक्षम, तांबड्या रंगाचा दाणा.
१०) ए के टी – ८८११
कालावधी दिवस : १५५-१६५
उत्पादन क्वि./हे. : १५-१६
वैशिष्ट्ये : दाण्याचा रंग लाल.
११) आयसीपीएल – ८७११९
कालावधी दिवस : १८५-१९०
उत्पादन क्वि./हे. : १५-१६
वैशिष्ट्ये : मर व वांझ रोगास प्रतिबंधक लाल दाणा.
१२) पी के व्ही तारा
कालावधी दिवस : १७०-१८०
उत्पादन क्वि./हे. : १९-२२
वैशिष्ट्ये : दाण्याचा रंग तांबडा.