
मागील दोन वर्षांमध्ये विदर्भात आणि मराठवाडात गावपातळीवर एकाही सहकारी प्राथमिक दूध संस्थेची स्थापना झालेली नसून . या उलट तब्बल ९१३ संस्था नव्याने एकट्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आल्या आहेत .
दूध व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी पशुसंवर्धन विभागावर मराठवाडा व विदर्भामध्ये प्रत्येक गावात एक सहकारी दूध संस्था सुरू करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे , तिथे दहा हजार गायी व म्हशी शासन अनुदानावर देण्यात येणार आहे .
या विभागाची राज्याचे दुग्ध विकास विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी तपासणी सुरू केली आहे. जिल्हानिहाय दूध संकलन किती आहेत ? विभागनिहाय प्राथमिक सहकारी दूध संस्था किती? याची माहिती गोळा करण्यात आली आहे . या तपासणी मध्ये मागील दोन वर्षामध्ये मराठवाडा व विदर्भात एकाही सहकारी दूध संस्थेची नव्याने नोंदणी झाली नसल्याचे आढळून आले.
या विभागांमध्ये पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे दूध व्यवसायाला वाव आहे; परंतु त्याचे नियोजन नाही असे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी येथे विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. पशुसंवर्धन विभागावर गाव तिथे सहकारी दूध संस्था’ स्थापन करण्याची कामगिरी दिली आहे.
मराठवाडा, विदर्भ ३५ लाख लिटर
विदर्भ व मराठवाड्यामध्ये केवळ प्रतिदिनी ३५ लाख लिटर दूध उत्पादन होते. पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्याच्या दुपटीपेक्षा जास्त दूध उत्पादन होते . त्यामुळे शासनाने येथे जास्त लक्ष केंद्रित केले.
पशुसंवर्धनमध्ये ‘दुग्ध’ विभाग विलीन
दुग्धविकास विभाग पशुसंवर्धन विभागात विलीन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
शासनाचे दूध संघांचे अस्तित्व संपुष्टात आले असल्यामुळे येथील कर्मचारी पशुसंवर्धन विभागात, तर काहींना इतर विभागात पाठवण्यात येणार आहेत .
दोन वर्षात नोंदणी झालेल्या दूध संस्था.
जिल्हानिहाय दैनंदिन दूध उत्पादन, लाख लिटरमध्ये
अहमदनगर – २४.८९
कोल्हापूर – २०.६९
पुणे – १९.३९
सोलापूर – १५.३५
सांगली – ११.५५
नाशिक – ९.१४
सातारा – ९.०१
जळगाव – ४.९७
धाराशिव – ४.९५
बीड – ३.७०
संभाजीनगर – ३.५९
लातूर – ३.१५
नांदेड – ३.०२
धुळे – २.०९
अमरावती – २.०६
बुलढाणा – १.८७
नागपूर – १.८६
जालना – १.६७
भंडारा – १.४०
परभणी- १.३५
यवतमाळ – १.३४
पालघर – १.३०
ठाणे – १.२९
रायगड – १.०१
गोंदिया – १.००
हिंगोली – १.००
अकोला – ०.९८
नंदुरबार – ०.९५
वर्धा – ०.९३
चंद्रपूर – ०.७०
रत्नागिरी – ०.६९
वाशिम – ०.६६
गडचिरोली – ०.४५
सिंधुदुर्ग – ०.४३
मुंबई – ०.२०