पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेमध्ये राज्य शासनाची भर घालण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या नमो शेतकरी महासंघ निधी योजनेच्या पहिल्या हप्त्यासाठी 1720 कोटी रुपयांच्या निधी वितरणास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. 15 ऑक्टोंबर पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचे वितरण करण्यात येणार आहेत.
85 लाख साठ हजार शेतकरी पात्र ठरले..
या योजनेसाठी राज्यातील 85 लाख साठ हजार शेतकरी पात्र ठरले आहे. दुसरा हप्ता लगेच पुढील महिन्यात वितरित करण्यात येईल असे एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान निधीच्या धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान योजनेची घोषणा अर्थसंकल्पनामध्ये अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. या योजनेअंतर्गत वर्षभरामध्ये तीन हप्त्यात प्रत्येकी दोन हजार रुपये असे सहा हजार रुपये वितरित करण्यात येणार आहे. यापैकी पहिला हप्ता एप्रिल ते जुलै दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर पर्यंत तर तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च अखेर देणे प्रस्तावित आहे.
केंद्र सरकारच्या पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या चौदाव्या हप्त्यासोबत हा हप्ता वितरित होणे अपेक्षित होते. परंतु केंद्र सरकारकडून माहिती हस्तांतरित होण्यास वेळ लागल्याने हप्ता वेळेत वितरित करण्यात आला नाही.
शिवाय कृषी विभागाने महसूल विभागाच्या यंत्रणेत पुरेसा सन्मान्वये नसल्याने या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या नोंदणीची प्रक्रिया रखडली होती. त्यामुळे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कडक सूचना देत शेतकऱ्यांची नोंदणी करून घेण्याबाबत सूचना दिल्या होत्या.
नमोचा लाभ पीएम किसान प्रणालीनुसार प्रत्येक हप्ता वितरणावेळी देण्याची निश्चित केले होते. मात्र कृषी विभागाने महसूल विभागाच्या घोळामुळे हे वेळापत्रक बिघडले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी एक कोटी 18 लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. मात्र छाननी अंतर्गत केवळ 85 लाख 7 हजार शेतकरी पात्र ठरले आहे . आता 13720 कोटी रुपयांच्या वितरणात मान्यता दिली आहे. हे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत.
पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते वितरण
महायुती सरकारसाठी महत्त्वाच्या असलेल्या या योजनेचे वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हावे, यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. पंतप्रधान मोदी हे दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित राहून या योजनेच्या वितरणाची घोषणा करतील, असेही कृषी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. कृषिमंत्री धनंजय मुंडे हेही मोदी यांच्या हस्ते वितरण व्हावे, या साठी आग्रही आहेत.