मोठा निर्णय,सरकारनं बिगर बासमती पांढऱ्या तांदळाच्या निर्यातीवरील संपूर्ण बंदी उठवली..

राज्यांतील निवडणुकांच्या तोंडावर आणखी एक निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.केंद्र सरकारने बिगर बासमती तांदळावरील निर्यातबंदी हटवली आहे. आता प्रती टन किमान निर्यात मूल्य ४९० डॉलर या दराने सर्व प्रकारच्या तांदळाची निर्यात करता येणार आहे.

या अगोदर फक्त बासमती तांदळाची निर्यात करता येणे शक्य होते. तसेच साध्या तांदळाची केंद्र सरकारमार्फत निर्यात केली जात होती . परंतु , आज झालेल्या निर्णयानुसार आता सर्व प्रकारच्या तांदळाची निर्यात खुली झाली आहे .

केंद्र सरकाने आधी असलेले किमान निर्यात मुल्य २०% टक्क्यावरून १० % करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती असून त्यासंदर्भातील अधिकृत परिपत्रक लवकरच निघण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच निर्यात होणाऱ्या या तांदळावर किमान निर्यात मूल्यासोबत निर्यात शुल्काचीही अट असणार आहे.

दरम्यान, हा निर्णय हरियाणा मधील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घेतल्याचे बोलले जात आहे. परंतु याचा फायदा सध्या भात उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे. इतर राज्यातील व महाराष्ट्रातील निवडणुकांना समोर ठेवून कांदा निर्यातबंदी उठवल्याचा निर्णय घेतला असल्याचा आरोप शेतकरी करत आहे .

देशांतर्गत भाताचे उत्पादन वाढवण्यासाठी केंद्र सरकारने २० जुलै २०२३ मध्ये बिगर बासमती पांढर्‍या तांदळावर निर्यातबंदी घातली होती. २० टक्के निर्यातशुल्कही बासमती तांदळावर लागू करण्यात आले होते . त्यानंतर तांदळाचे दर निर्यात केल्या जाणाऱ्या देशांमध्ये वाढले होते. तर फिलीपीन्स,कॅमरून, कोटडी आयवरी,नेपाळ, सेशेल्स, मलेशिया, आणि गिनी या देशांना सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा फायदा होणार आहे.

Leave a Reply