
kanda bajarbhav :आज सकाळी पुणे-पिंपरी बाजारसमितीत ८ क्विंटल कांदा आवक होऊन बाजारभाव कमीत कमी ८०० रुपये जास्तीत जास्त १७०० आणि सरासरी १२५० इतके राहिले. कालच्या तुलनेत या ठिकाणी बाजार पडलेले दिसून आले. मात्र मागील आठवड्याच्या तुलनेत राज्यात उन्हाळी कांदा बाजार किंचितसा वधारला असून लाल कांद्याची आवक आता घटताना दिसत आहे.
दरम्यान काल ७ एप्रिल २०२५ रोजी राज्यात उन्हाळी कांद्याची एकूण १,६२,६८२ क्विंटल इतकी आवक झाली, तर लाल कांद्याची आवक ४१,५७६ क्विंटल इतकी नोंदली गेली. उन्हाळी कांद्याला सरासरी बाजारभाव ११८० रुपये प्रतिक्विंटल मिळाला, तर लाल कांद्याला सरासरी १११७ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.
राज्यातील सटाणा (जि. नाशिक) बाजारात १४,०४० क्विंटल इतकी सर्वाधिक उन्हाळी कांद्याची आवक झाली. दराच्या बाबतीत पाहता कामठी बाजारात कांद्याला सर्वाधिक सरासरी बाजारभाव म्हणजेच ३००० रुपये प्रतिक्विंटल मिळाला.
लासलगाव बाजारात उन्हाळी कांद्याला सरासरी १३४० रुपये तर लाल कांद्याला ११०० रुपये दर मिळाला. पिंपळगाव बसवंत येथे उन्हाळी कांद्याला १३५० रुपये आणि लाल कांद्याला ११०० रुपये दर मिळाला. नाशिक बाजारात उन्हाळी कांद्याचा सरासरी दर १२०० रुपये इतका होता. मागील आठवड्याच्या तुलनेत हे दर १०० रुपयांनी वाढून स्थिरावले आहेत.
पुणे बाजारात उन्हाळी कांद्याला १२०० रुपये, तर लाल कांद्याला १२५० रुपये सरासरी दर मिळाला. सोलापूर बाजारात लाल कांद्याला ११५० रुपये दर मिळाला. राहुरी येथे उन्हाळी कांद्याला ८५० रुपये आणि लाल कांद्याला १३०० रुपये सरासरी दर मिळाला. छत्रपती संभाजीनगर येथे कांद्याला सरासरी १००० रुपये दर मिळाला.
नागपूर, सांगली व कोल्हापूर या बाजारांमध्ये लाल कांद्याला अनुक्रमे १०००, १०५० आणि १२०० रुपये सरासरी दर मिळाला. अहिल्यानगर बाजारात उन्हाळी कांद्याला सरासरी १०५० रुपये दर मिळाला.