डॉ. पंजाबराव देशमुख यांची १२५ वी जयंती निमित्ताने राज्यात कृषि संजिवनी पंधरवड्याचे असे आहे आयोजन..

दि. १७ जून २०२४ ते दि. ०१ जुलै २०२४ या कालावधीमध्ये डॉ. पंजाबराव देशमुख यांची १२५ वी जयंती निमित्ताने कृषि संजिवनी पंधरवडा आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. कृषि संजिवनी पंधरवडाची सांगता दिनांक १ जुलै २०२४ रोजी मा. स्व. वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनी कृषि दिन म्हणून साजरा करून करावयाची आहे.

दि. १७ जून २०२४ ते दि. ०१ जुलै २०२४ या कालावधीत प्रत्येक दिवशी खालीलप्रमाणे महत्वाच्या मोहिमांवर विशेष भर देऊन “कृषि संजीवनी पंधरवडा साजरा करावयाचा आहे. संपुर्ण राज्यातून एकाच दिवशी एकाच मोहीमेची प्रचार व प्रसिद्धी होत आहे.

त्या अनुषंगाने संपूर्ण राज्यामध्ये या पंधरवड्यामध्ये प्रत्येक दिवशी विशिष्ट मुद्द्यांवर शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करणे हा या कृषि संजिवनी पंधरवडा कार्यक्रमाचा उद्देश राहणार आहे.

१) दि.१७ जून २०२४ – बीजप्रक्रिया जनजागृती दिन
२) दि.१८ जून २०२४ – पी. एम. किसान उत्सव दिवस
३) दि.१९ जून २०२४ – जमिन सुपिकता जागृती दिन
४) दि.२० जून २०२४ – गुणवत्तापूर्ण निविष्ठांची ओळख दिन
५) दि.२१ जून २०२४ – महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड व तंत्रज्ञान प्रसार
६) दि. २२ जून २०२४ – पिक विमा जनजागृती दिन
७) दि. २३ जून २०२४ – हवामान अनुकूल शेती तंत्रज्ञान प्रसार दिन
८) दि. २४ जून २०२४ – सोयाबीन व मका लागवड तंत्रज्ञान दिन
९) दि. २५ जून २०२४ – कापूस, भात व ऊस लागवड तंत्रज्ञान दिन
१०) दि. २६ जून २०२४ – तूर व इतर कडधान्य लागवड तंत्रज्ञान दिन
११) दि. २७ जून २०२४ – कृषि महिला शेतकरी सन्मान दिन
१२) दि. २८ जून २०२४ – जिल्ह्यातील महत्त्वाच्या पिकांची कीड व रोग नियंत्रणाच्या उपाययोजना
१३) दि. २९ जून २०२४ – शेतकरी मासिक वाचन दिन व वर्गणीदार वाढविणे
१४) दि. ३० जून २०२४ – प्रगतशील शेतकरी संवाद दिन
१५) दि.१ जुलै २०२४ – कृषि दिन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *