इथेनाॅलसाठी मक्याला मागणी वाढण्याची शक्यता, वाचा सविस्तर …

मागील काही महिन्यापासून देशातील बाजारात मक्याचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारातील भावापेक्षा अधिक आहेत.  त्यामुळे निर्यात कमी होत आहे पण देशातील मक्याचा वापर वाढल्याने मागणी चांगली राहू शकते.

त्यातच इथेनॉलसाठी मक्याला मागणी वाढण्याचा अंदाज असून याचा आधार मका बाजारालाही मिळू शकतो, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.  देशातील मका उत्पादन यंदा गेल्यावर्षीपेक्षा कमीच राहण्याचा अंदाज असून मागील हंगामात देशात 359 लाख टन मका उत्पादन झाली होती.  ते यंदा ३४३ टनांवर स्थिर होण्याची शक्यता आहे.  यंदा उत्पादन घटण्याचे महत्त्वाचे कारण आहे.

महत्त्वाच्या मका उत्पादक राज्यांमध्ये उत्पादकता घटल्याचे.  यंदा खरीप हंगामात पाऊस कमी होता याचा फटका मका पिकाला बसला तसेच लागवड ही काही प्रमाणात घटली होती त्यामुळे एकूणच उत्पादन कमी राहण्याची शक्यता आहे.

मागील काही महिन्यापासून आंतरराष्ट्रीय बाजारात मक्याचे भाव दबावात आहेत. मक्याचा बाजार अपेक्षेपेक्षाही कमी पातळीवर असल्याचे अभ्यासक सांगतात पण देशात मात्र मक्याचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारात भावापेक्षा काहीसे अधिक होते ,म्हणजेच देशातील मका निर्यतीसाठी स्पर्धात्मक नव्हती.  त्यामुळे भूतान, नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंका असे शेजारच्या देशांना भारताची मका घेणे परवडत नव्हते.  त्यामुळे निर्यात गेल्यावर्षी पेक्षा कमी दिसत आहे.

देशात ऑगस्ट महिन्यापासून मक्याचे भाव काहीसे वाढले आहेत पण दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात मक्याचे भाव कमी होत गेले त्यामुळे भारताचा मका आंतरराष्ट्रीय बाजारात महाग होत गेला. सध्याच्या दक्षिण आशियातील बाजारात मक्याचे जे  भाव आहेत त्यांच्या तुलनेत भारताच्या मक्याचे भाव त्यांना मागे वीस ते तीस डॉलरने अधिक आहेत.त्यामुळे देशातून होणारी मक्याचे भाव टनामागे २० ते ३० डाॅलरने अधिक आहेत. देशातून मागील हंगामात जवळपास 32 लाख तर मका निर्यात झाली होती.  तर यंदा निर्यात 31 टन स्थिरावू शकते असाही अंदाज व्यक्त केला आहे.

मकाला उठाव  मिळू शकतो.

केंद्र सरकारने थेट ऊस आणि उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.  पण देशातील इथेनॉल उत्पादन घटणार नाही असा दावा सरकारने  केला . यामुळे धान्यापासून इथेनाॅल निर्मिती वाढू शकते पण देशात केवळ मक्याचा पुरवठा चांगला दिसतो,किमतीही  नियंत्रणात आहेत . त्यामुळे इथेनाॅलसाठी मक्याचा वापर वाढू शकतो.  एक टन मका पासून 370 लिटर इथेनॉल मिळते . यामुळे मक्याला इथेनॉल साठी मागणी वाढू शकते असे झाल्यास पुढील काळातही देशातील बाजारातील मकाचे भाव चांगले राहू शकतात असा अंदाज आहे.

यंदा वापर कसा राहू शकतो?

देशात यंदा ३२५ लाख टन मक्याचा वापर होण्याचा अंदाज आहे. यापैकी २०० लाख टन पशुखाद्यसाठी होऊ शकतो तर १२५ लाख टन मानवी आहार, बियाणे आणि औद्योगिक वापरासाठी होऊ शकतो, असाही अंदाज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *