लसणाचे भाव वधारले ! प्रतिकिलोचा दर २४० रुपयांवर ..

लसणाचे भाव वधारले ! प्रतिकिलोचा दर २४० रुपयांवर ..

मध्य प्रदेशातून लसणाची आवक घटल्यामुळे घाऊक सह किरकोळ बाजारामध्ये लसणाचे दर कडाडले आहेत.गुलटेकडी मार्केट यार्ड येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तरकारी विभागात रविवारी (दिनांक 10) पाच ते सहा ट्रक मधून लसणाची आवक झाली. 

मागील आठवड्याच्या तुलनेत ती दोन ट्रकने कमी राहिली.  परिणामी  बाजारात लसणाचे किलोचे दर 95 ते 160 रुपयावर होते.  तर किरकोळ बाजारात लसणाचे दर हे 220 ते 240 रुपये किलोवर पोहोचले आहेत. 

गुलटेकडी मार्केट यार्ड मध्ये रविवारी राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे 90 ते 95 ट्रक फळभाज्यांची आवक झाली.  लसूण व वगळता अन्य फळभाज्यांची आवक कायम असल्याने दर टिकून होते. 

परराज्यातून झालेल्या आवकमध्ये गुजरात कर्नाटका तून हिरवी मिरची सुमारे दहा ते बारा टेम्पो , कर्नाटक गुजरात येथून कोबी तीन ते चार टेम्पो, आंध्र प्रदेश तमिळनाडू येथून चार ते पाच टेम्पो शेवगा , इंदूर इथून 12 ते 13 टेम्पो, गाजर,  कर्नाटक येथून घेवडा चार ते पाच टेम्पो ,मंगळूर येथून आले एक टेम्पो , मध्य प्रदेश येथून लसूण सुमारे पाच ते सहा टेम्पो आवक झाली आहे. 

स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये  सातारी आले सुमारे 600 ते 700 गोणी, भेंडी सहा ते सात टेम्पो ,गवार सहा ते सात टेम्पो ,टोमॅटो सुमारे 12 ते 13000 कॅरेट ,काकडी आठ ते दहा टेम्पो ,हिरवी मिरची तीन ते चार टेम्पो ,फ्लावर दहा ते बारा ,कोबी चार ते पाच टेम्पो ,सिमला मिरची दहा ते बारा टेम्पो ,भुईमूग शेंगा सुमारे 100 ते 125 गोणी ,भोपळा दहा ते बारा टेम्पो, 

पावटा चार ते पाच टेम्पो,  पुरंदर, पारनेर ,वाई, आणि १७ परिसरातून पाच ते सहा टेम्पो कांदा सुमारे 80 ट्रक इंदोर ,आग्रा ,स्थानिक भागातून बटाटा 50 ट्रक इतके आवक झाली होती . अशी माहिती मार्केट यार्ड येथील जेष्ठ आडतदार विलास भुजबळ यांनी दिली. 

पालेभाज्यांचे भाव जैसे

पावसाने उघडी दिल्यानंतर मार्केट यार्ड तीन घाऊक बाजारात पालेभाज्यांची आवक चांगल्या प्रमाणात होत आहे.  त्या तुलनेने मागणी ही असल्यामुळे घाऊक बाजारात सर्व प्रकारच्या पालेभाज्यांचे कमी झालेली भाव टिकून आहेत.  रविवारी बाजारामध्ये कोथिंबिरीची सव्वा लाख तर मेथीची 50 हजार जोडीची आवक झाली.  मागील आठवड्याच्या तुलनेमध्ये कोथिंबीर व मेथीची आवक स्थिर राहिली . घाऊक बाजारात पालेभाज्यांच्या एका जुडीची तीन ते अठरा रुपये तर किरकोळ बाजारात एकच दहा ते पंधरा रुपये या दराने विक्री सुरू होती. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *