आज आम्ही शेतकऱ्यांसाठी काकडीच्या सुधारित वाणांची माहिती घेऊन आलो आहोत. देशातील बहुतांश शेतकरी पीक हंगामात काकडीची लागवड करतात. कारण उन्हाळी हंगामात बाजारात काकडीची मागणी खूप असते.
अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी आजच्या काळात सुधारित जातीच्या काकडीची लागवड केली तर त्यामुळे त्याला बाजारातून वेळेत चांगला नफा मिळू शकतो. काकडीच्या या सुधारित जातींबद्दल सविस्तर माहिती घेऊया…
काकडीच्या शीर्ष जाती :-
हिमांगी –
राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाणे ही जात विकसीत केली आहे. 150 ते 200 ग्रॅमपर्यंत काकडीचे वजन असते. काकडीमध्ये गर जास्त असल्यामुळे व बियांचे प्रमाण कमी असल्यामुळे चवीला उत्तम लागते .हेक्टरी 170 ते 190 क्विंटल उत्पादन या जातीपासून मिळते.
शीतल वाण –
बी पेरल्यापासून या जातीची काकडी ४५ दिवसांनी येते. याची काकडी हिरवी व मध्यम रंगाची असतात. 200 ते 250 ग्रॅम फळांचे वजन असते. 30 ते 35 टन हेक्टरी उत्पादन मिळते.
प्रिया –
ही संकरीत जात आहे व याची फळे गर्द हिरवी व सरळ असतात. याचे 30 ते 35 टनहेक्टरी उत्पादन मिळते.
पुना खिरा -पिवळट व हिरवे ,तांबडी काकडी येणारे दोन प्रकारचे बियाणे या जातीमध्ये असतात . ही काकडीची जात लवकर येणारी आहे मात्र याची फळे लहान आकारानी असतात.उन्हाळी हंगामामध्ये लागवड करण्यास ही जात चांगली आहे . हे वाण 13 ते 15 टन हेक्टरी उत्पादन देते.
फुले शुभांगी –
राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथे ही जात विकसीत केली आहे. उन्हाळी आणि खरीप हंगामामध्ये प्रामुख्याने ही जात व घेतली जाते. या जातीची काकडी आठ ते दहा दिवसापर्यंत चांगल्या स्थितीत राहते .180 ते 190 क्विंटल उत्पादन या जातीपासून हेक्टरी मिळते.
पुसा संयोग –
ही जात लवकर येते व फळे हिरव्या रंगाची असतात. 25 ते 30 टन हेक्टरी उत्पादन मिळते.