राज्य सरकारने खरीप हंगामासाठी पीककर्जाची रक्कम निश्चित केली आहे. त्यानुसार जिल्ह्यामध्ये द्राक्षपिकासाठी सर्वात जास्त ३ लाख ७० हजारांचे कर्ज देण्यात येणार आहे , खरिपातील प्रमुख पीक असलेल्या बाजरी पिकासाठी प्रति हेक्टर ४३ हजार रुपयांचे कर्ज मिळणार आहे.
पीक किमान कर्ज..
■ द्राक्ष ३,७०,०००-३,५०,०००
■ ऊस १,६५,०००-१,६०,०००
■ बटाटा १,०५,०००-१,००,०००
■ भात ७५,०००-६५,०००
■ बाजरी ४३,०००-३०,०००
■ ज्वारी ४४,०००-३०,०००
■ कापूस ६५,०००-५२,०००
■ मका ३७,०००-३०,०००
■ सोयाबीन ६०,०००-५५,०००
■ टोमॅटो १,०५,०००-१,००,०००
यावर्षी कर्जात २० हजार वाढ.
द्राक्षपिकाची लागवड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे.अन्य पिकांच्या तुलनेत या पिकाला हेक्टरी लागणारा खर्च जास्त असल्याने द्राक्षासाठी हेक्टरी ३ लाख ७० हजार रुपयांचे कर्ज दिले जाते. गेल्यावर्षीच्या तुलनेमध्ये यंदा त्यात २० हजारांची वाढ करण्यात आले आहे. .
कर्जमर्यादा वाढवली..
दरवर्षी बियाणे, खते, तसेच औषधांच्या किमतीमध्ये वाढ होत आहे त्यामुळे पीककर्ज मर्यादितही वाढ करण्यात आली आहे. हे पीककर्ज मर्यादा जिल्हास्तरीय तांत्रिक समितीच्या निर्णयानुसार निश्चित करण्यात येते. तसेच राष्ट्रीयीकृत बँका ,जिल्हा मध्यवर्ती बँका व खासगी बँकाही कर्ज देतात. शेतकऱ्यांनी पीककर्ज मर्यादेनुसार मागणी करावी. – अनिरुद्ध देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी, पीडीसीसी बँक