जनावरांसाठी आली ही चाचणी आता अगोदरच कळेल दुधाची उत्पादकता जाणून घ्या सविस्तर ..

जर लाखो रुपये देऊन सुद्धा खरेदी केलेल्या जनावराने फसवले तर शेतकऱ्याचे कुटुंब अडचणीत येते . जरी जातिवंत म्हशी ,गायी आपण खरेदी केल्या तरीही अपेक्षित प्रमाणे दूध देतीलच असे नाही. त्यामुळे आता खरेदी पूर्वी जनावराची डीएनए चाचणी केली तर दूध उत्पादकता किती आहे हे समजण्यास मदत होणार आहे .

खरेदी पूर्वी संबंधित जनावराची डीएनए चाचणी केली तर त्यातून म्हशींमध्ये जातिवंत असण्याची किती टक्केवारी आहे तसेच त्याची दूध उत्पादकता, व आयुष्यमान कळाले तर शेतकऱ्यांच्या दृष्टीने ते फायदेशीर ठरेल.

यावर बांगलादेशात संशोधन झाले असून, याची भारतासह श्रीलंका, साऊथ कोरिया,थायलंड, येथे अंमलबजावणी करण्यासाठी नुकतीच दिल्ली येथे बैठक झाली. थायलंड सरकारचे वाणिज्य सल्लागार डॉ. चेतन नरके आणि भारत व थायलंड देशाकडून इंडियन डेअरी असोसिएशनचे सदस्य यांच्यावर जबाबदारी सोपविली आहे.

२३० मिलियन टन दूध उत्पादन भारतात प्रतिदिन होते. २०४८ पर्यंत ६२८ मिलियन टन दूध उत्पादन करण्याचे उद्दिष्ट भारताने ठेवले आहे.देशाच्या एकूण जीडीपीमध्ये दूध व्यवसायाचा ५.५० टक्के वाटा  आहे.त्यासाठी जातिवंत दुभती जनावरांची पैदास महत्त्वाची आहे

आपल्याकडे वापरात असलेली जमीन ,ओल्या चाऱ्यासाठी राखीव जमीन याचा विचार केला तर जनावरांची संख्या वाढविण्यावर मर्यादा येतील .शेतकऱ्यांनी त्यामुळे दूध उत्पादकता वाढवली पाहिजे अशा प्रकारचे संशोधन भारतात होणे अपेक्षित आहे

परराज्यातील गुजरात,हरियाणा आदी राज्यांतून जातिवंत म्हैस खरेदी करायची असल्यास सव्वा लाख रुपये मोजावे लागतात. परंतु ,आपल्या गोठ्यामध्ये ही म्हैस आल्यावर वातावरणात बदल होतो, पशुखाद्य बदलते आणि अपेक्षित दूध मिळत नाही. जर गाई म्हशींने जर अपेक्षित दूध दिले नाही तर शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण होतात.  किमान म्हशीच्या पहिल्या वेतामध्ये ५० टक्के तरी कर्जाची परतफेड होणे अपेक्षित असते.

तसेच भाकडकाळ वाढला तर शेतकऱ्याला कर्जाचे व्याजच भरत राहावे लागते . यासाठी म्हैस खरेदी करतानाच तिचे आयुष्यमान किती आहे, ती किती दूध देऊ शकेल, हे जर आधीच शेतकऱ्याला कळाले , तर त्याची खरेदी करताना फसवणूक होणार नाही.

७३ मिलियन टन म्हशीचे दूध फक्त भारतात..

म्हशी व गायींचे २३० मिलियन टन दूध उत्पादन प्रतिदिन भारतामध्ये आहे. त्यापैकी केवळ ३२ टक्केच, म्हणजेच ७३ मिलियन टन म्हशींचे उत्पादन आहे.हे उत्पादन वाढवायचे असल्यास शेतकऱ्यांच्या गोठ्यापर्यंत नवतंत्रज्ञान घेऊन जाण्याची आवश्यकता आहे.

न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियामध्ये व्यवसाय घटला

जगात दूध उत्पादनामध्ये न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया अग्रस्थानी आहे . परंतु , ग्रीन गॅस’ उत्सर्जनाची समस्या येत आहे . त्याचा थेट परिणाम ग्लोबल वॉर्मिंगवर होत असल्यामुळे त्यांनी दूध व्यवसाय थोडा कमी केला आहे. त्यामुळे आपणाला हा व्यवसाय वाढविण्याची संधी उपलब्ध आहे.

लवकरच चेतन नरके घेणार केंद्रीय पशुसंवर्धन मंत्र्यांची भेट

लवकरच डॉ. चेतन नरके हे बांगलादेशाचे संशोधन भारतात आणावे, यासाठी केंद्रीय दुग्धविकास व पशुसंवर्धन मंत्री राजीव रंजन सिंग यांची भेट घेणार आहेत.

आपल्या देशातील दुधाचे उत्पादन आणि मागणी हे आता जरी समप्रमाणात असले तरी भविष्यामध्ये मात्र लोकसंख्येची होणारी वाढ आणि दुधाचे उत्पादन हे प्रमाण निश्चितच व्यस्त राहणार आहे. त्यामुळे आतापासूनच आपण त्याकडे बघितले पाहिजे. यासाठी गेल्या आठवड्यामध्ये दिल्लीत साऊथ कोरिया , श्रीलंका, बांगलादेश, भारत, थायलंड या देशाच्या प्रतिनिधींची महत्त्वपूर्ण बैठक झाली, यामध्ये म्हैस खरेदी अगोदर त्याला जर तिची उत्पादक व तिला असणारा आजार आणि त्यातून तिचे आयुष्यमान समजले तर जास्त चांगले होईल. माझ्या शेणा-मूत्रात राबणाऱ्या दूध उत्पादकांची होणारी फसवणूक थांबावी माझ्या शेणा-मूत्रात राबणाऱ्या दूध उत्पादकांची होणारी फसवणूक थांबावी हे सगळे डीएनए चाचणीच्या माध्यमातून कळणार आहे तर ते संशोधन भारतात आले पाहिजे, त्यामुळे केंद्रीय पशुसंवर्धन मंत्र्यांची लवकरच भेट घेणार आहे.
– डॉ. चेतन नरके (सदस्य, इंडियन डेअरी असोसिएशन, नवी दिल्ली)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *