Tomato bajarbhav : टोमॅटो बाजारात सध्या वाढीचा ट्रेंड; कुठे किती टक्के वाढ जाणून घ्या…

Tomato bajarbhav : टोमॅटो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मागील दोन आठवड्यापासून राज्यात टोमॅटोचे बाजारभाव वाढत असल्याचा कल दिसून येत आहे. विशेष म्हणजे मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा टोमॅटोचे बाजारभाव चांगले आहेत. महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांमध्ये १८ मे पर्यंतच्या आठवड्यात टोमॅटोच्या दरात लक्षणीय चढ-उतार दिसून आले. या आठवड्यात राज्यातील रायगड आणि ठाणे जिल्ह्यांमध्ये टोमॅटोला सर्वाधिक दर मिळाला.

रायगड व ठाणे या दोन्ही जिल्ह्यांमध्ये टोमॅटोचा दर २७५० रुपये प्रति क्विंटल इतका होता, जो राज्यात सर्वोच्च होता. याउलट, चंद्रपूरमध्ये दर ६०० रुपये तर रत्नागिरीमध्ये केवळ १३०० रुपये इतका राहिला. विशेष म्हणजे, रत्नागिरीमध्ये मागच्या आठवड्यात दर ४१९६ रुपये होता, म्हणजेच तेथे जवळपास ६९ टक्क्यांनी घसरण झाली.

पुणे, कोल्हापूर, मुंबई, नाशिक आणि जळगाव अशा जिल्ह्यांमध्ये मागच्या आठवड्याच्या तुलनेत टोमॅटोच्या बाजारभावात मोठी वाढ झाली आहे. कोल्हापूरमध्ये दर ४९.८ टक्क्यांनी वाढून १००६ रुपयांवरून १५०७ रुपयांपर्यंत पोहोचला. पुण्यात २९.९९ टक्के, नाशिकमध्ये २८.५९ टक्के आणि मुंबईमध्ये ३१.९ टक्के इतकी वाढ नोंदवली गेली. जळगाव जिल्ह्यात २५.५२ टक्के वाढ झाली आहे.

टक्केवारीच्या आधारे जिल्हानिहाय बाजारभाव वाढीचा विचार केला असता पुढील चित्र दिसून येते:

* कोल्हापूर – ४९.८%
* जळगाव – २५.५२%
* नाशिक – २८.५९%
* पुणे – २९.९९%
* मुंबई – ३१.९%
* रायगड – २९.१७%
* ठाणे – ३५.८%
* संभाजीनगर – १९.२९%
* नागपूर – ६.५६%
* सोलापूर – ६.५१%
* सांगली – ६.७४%
* सातारा – ७.९६%