Tur Bajarbhav : बाजारात नवी तुरी अन्‌ भाव मिळणार भारी..

Tur Bajarbhav : सध्या बाजारात तुरीचे बाजारभाव सरासरी ७ हजार पाचशे ते ९ हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास आहेत. आगामी काळात तुरीचे नवीन पीक बाजारात आल्यावर त्याला काय भाव मिळेल, याची शेतकऱ्यांना उत्सुकता आहे. स्मार्ट ॲग्री प्रकल्पातील बाजार माहिती विश्लेषण आणि जोखीम व्यवस्थापन कक्षातील तज्ज्ञांनी या बद्दल सांगितले आहे. त्यांनी माहितीचे विश्लेषण करून जानेवारी ते मार्च २०२५ दरम्यान तुरीचे काय बाजारभाव राहतील याचा अंदाज वर्तवला आहे.

भारत हा जगातील सर्वात मोठा तूर उत्पादक तसेच उपभोक्ता देश आहे. भारतातील तूर उत्पादनात महाराष्ट्र. कर्नाटक आणि उत्तर प्रदेश राज्यांचा वाटा ६० टक्के पेक्षा जास्त आहे. तुरीच्या बाजारपेठेवर मागील वर्षातील तूर साठा, आयात तसेच चालू वर्षातील उत्पादन यांचा परिणाम होताना दिसतो. केंद्र शासनाने तूर निर्यातीसाठी खुली केली असून तूरीचा आयात कोटा मर्यादित ठेवलेला आहे.

माहे डिसेंबर ते एप्रिल हा तुरीचा प्रमुख विक्री हंगाम असतो. चालू वर्ष नोव्हेंबर (२२ नोव्हेंबर २०२४) मधील तुरीची आवक मागील वर्षाच्या तुलनेत कमी राहिलेली दिसून येत आहे. नोव्हेंबर २०२४ मध्ये १.४ लाख टन आहे, जी मागील वर्षी याच कालावधीत १.८ लाख टन होती.

तूर हे खरीप पिक असून त्याची पेरणी जून ते जुलै व काढणी डिसेंबर ते फेब्रुवारी या दरम्यान केली जाते. भारत सरकारने जाहीर केलेल्या नवीन उत्पादन अंदाजानुसार सन २०२३-२४ मध्ये तुरीचे उत्पादन सुमारे ३४.१७ लाख टन होण्याची शक्यता आहे. जे मागील वर्षीच्या तुलनेत जास्त असल्याचे दिसून येत आहे. तसेच महाराष्ट्रातील २०२२-२३ मधील उत्पादन ८.६ लाख टनांवरून सन २०२३-२४ मध्ये १०.१ लाख टनांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

तूर हे खरीप पिक असून त्याची पेरणी जून ते जुलै व काढणी डिसेंबर ते फेब्रुवारी या दरम्यान केली जाते. भारत सरकारने जाहीर केलेल्या नवीन उत्पादन अंदाजानुसार सन २०२३-२४ मध्ये तुरीचे उत्पादन सुमारे ३४.१७ लाख टन होण्याची शक्यता आहे. जे मागील वर्षीच्या तुलनेत जास्त असल्याचे दिसून येत आहे. तसेच महाराष्ट्रातील २०२२-२३ मधील उत्पादन ८.६ लाख टनांवरून सन २०२३-२४ मध्ये १०.१ लाख टनांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

डिसेंबर २०२२ पासून तुरीच्या किंमती वाढत आहेत. गतवर्षीच्या दरापेक्षा बालू वर्षी तुरीचे भाव जास्त आहेत. मागील तीन वर्षातील लातूर बाजारपेठेतील तुरीच्या जानेवारी ते मार्च मधील सरासरी किंमती खालीलप्रमाणे:
जानेवारी ते मार्च २०२२: रु. ६.३१०/क्विंटल
जानेवारी ते मार्च २०२३: रु.७,७३५/क्विंटल
जानेवारी ते मार्च २०२४: रु.८,९६६/क्विटल

सध्याच्या हंगामासाठी सरकारने खरीप २०२४-२५ साठी जाहीर केलेल्या किमान आधारभूत किंमतीपेक्षा (रु. ३५५०/क्विंटल) सध्याच्या तुरीच्या किंमती जास्त आहेत. मागील वर्ष २०२२-२३ च्या तुलनेत २०२३-२४ मध्ये आयात कमी झालेली आहे तर निर्यात वाढलेली आहे.

यंदा लातूर बाजारातील संभाव्य किंमती अशा राहणार आहेत: जानेवारी ते मार्च २०२५ :९,००० ते १०,५००/ प्रति क्विंटल (गेल्या वर्षांच्या तुलनेत चालू वर्षातील आयात जास्त राहील असे गृहीत धरून हा अंदाज वर्तविण्यात आला आहे)12:52 PM

 
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *