येत्या २५ डिसेंबरपासून ‘कोयता बंद’ आंदोलन करण्याचा इशारा..

राज्यातील सर्व ऊस तोडणी कामगारांना तोडणी साठी प्रति टन 410 रुपये देण्यात यावेत अशी मागणी ऊस तोडणी कामगारांच्या सर्व संघटनांनी राज्य सहकारी साखर कारखान्यांना महासंघाकडे केली आहे.  मात्र हा दर देण्यास साखर महासंघाने असमर्थता दर्शवली आहे . त्यामुळे ही मागणी येत्या दहा दिवसात पूर्ण करावी अन्यथा येथे 25डिसेंबर पासून कोणता ‘कोयता बंद’ आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य ऊसतोड कामगार मुकादम व वाहतूक संघटनेच्या सर्व संघटनांनी गुरुवारी पत्रकार परिषद बोलताना दिला आहे.  ऊसतोड कामगारांचे चालू हंगामातील ऊस तोडणी आणि भरणीसाठीच्या प्रचलित करत 55 टक्के वाढ करण्याची मागणी ऊसतोड कामगार संघटनांनी केली आहे.

त्यांच्या या मागणीवर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी संघटनांच्या मागणीवर एक मत होऊ शकले नाही. त्यामुळे आजची बैठक ही फिसकटलीआहे.राज्यातील ऊस तोडणी मजुरीचा प्रचलित दर सध्या 273 रुपये दहा पैसे इतका आहे. या दरात आणखीन किमान ५५ टक्के वाढ करण्याची कामगार संघटनांची प्रमुख मागणी आहे. मात्र , आजच्या बैठकीत तो ५५ टक्क्यांऐवजी 50 टक्के वाढ करून तो प्रति टन 410 रुपये इतका करावा अशी मागणी या संघटनांनी आजच्या बैठकीत बोलताना केली साखर संकुल येथील राज्य सरकारी साखर कारखाना संघाच्या कार्यालयात आज ऊसतोड कामगार संघटनेची आणि कारखाना महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक झाली या बैठकीत अंतिम निर्णय होऊ शकला नाही.

या बैठकीला राज्य सरकारी साखर महासंघाचे अध्यक्ष पीआर पाटील राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील आणि ऊसतोड कामगार संघटनांचे डॉक्टर डी एल कराड दत्ता डहाके, सुखदेव सानप, प्रा. सुशीला मोराळे, दत्तात्रेय भांगे, गहिनीनाथ थोरे पाटील, संजय तिडके आदींसह विविध सात ऊसतोड कामगार संघटनांचे पदाधिकारी बैठकीस उपस्थित होते. या बैठकीनंतर ऊसतोड कामगार संघटनांनी कोयता बंद आंदोलनाची घोषणा केली.

राज्य सहकारी साखर महासंघाने सध्याच्या प्रचलित दरात आणखीन तीन टक्के वाढ करण्यास सहमती दर्शवली आहे. त्यामुळे पूर्वी झालेल्या निर्णयानुसार सध्या 24 टक्के वाढ देण्यात आलेली आहे . त्या तीन टक्क्यांची भर पडून ती आता 27 टक्के करण्यास साखर महासंघ तयार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.  कामगार संघटनांनी मात्र मागणी केलेल्या 55% दर वाढतील पाच टक्के कमी करण्याची तयारी दर्शवली आहे.

वाहतूक खर्चात दुपटीने वाढ करा.

ऊसतोड कामगारांसाठी अपघात विमा योजना लागू आहे . मात्र कामगारांच्या पाच वर्षाच्या आतील वय असलेल्या मुलांना विम्याची कवच मिळावे.  स्वर्गीय गोपीनाथ मुंडे ऊस तोडणी कामगार महामंडळाच्या अखत्यारित घेतले गेलेल्या निर्णयांची माहिती सर्व कामगार संघटनांना दिली जावी,ऊस तोडणी वाहतूक व भरणी मजुरी वरील मुकादमच्या कमिशनर मध्ये दोन टक्के वाढ करूनही कमिशन 21% करावे.  ऊसतोड कामगारांची  ने-आण करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या  वाहतुकीचे खर्च दुपटीने वाढ करावी ,आदी मागण्या महाराष्ट्र राज्य ऊसतोड कामगार मुकादम व वाहतूक संघटनेच्या सर्व संघटनांनी केल्या आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *