मागील वर्षी सोलापूर जिल्ह्यात दुष्काळ पडला होता. यंदा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. यंदा उजनी धरण 100 टक्के भरणार आहे, असा दावा हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी केला आहे. परंतु या वर्षी सोलापूर जिल्ह्यामध्ये जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसाळ्यामध्ये यंदा उजनी धरण 100 टक्के भरणार आहे , महत्त्वाचं म्हणजे याआधी उजणी धरण 2021 मध्ये 100 टक्के भरलं होतं.धाराशिवपासून पुणे, सांगलीपर्यंत दुष्काळी पट्ट्यात चांगला पाऊस पडेल, असा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख दिला आहे .
उजनी धरण 100 टक्के भरणार..
वर्षभरातील पावसाचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी मांडला आहे. 11 ते 14 जून दरम्यान सोलापूर, अहिल्यानगर,,सातारा, सांगली धाराशिव जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे. याशिवाय. यावर्षी जूनमध्येच सर्वात जास्त पाऊस असेल, असंही त्यांनी सांगितलं आहे.
हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी वर्तवला अंदाज..
जून पेक्षा जुलै महिन्यामध्ये पावसाचा जोर जास्त असेल तर ऑगस्ट महिन्यात पावसाचे प्रमाण कमी असेल. तर सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यामध्ये सुद्धा पावसाचे प्रमाण कमी असेल असा अंदाज पंजाबराव डख यांनी दिला आहे. दरम्यान, 5 नोव्हेंबरपासून मान्सून देशातून माघारी फिरेल असा अंदाज यावेळी त्यांनी दिला.
उजनीची पाणी पातळी दोन टक्क्यांनी वाढली
1 जूनपासून उजनी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये 75 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे उजनी धरणाची पाणी पातळी २ % वाढली आहे. तसेच 1.012 टीएमसी पाणीसाठा वाढला आहे.जूनच्या पहिल्या आठवड्यात उजनी धरणाची पाणी पातळी वाढू लागल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. नीरा आणि भीमा खोऱ्यातील पाणलोट क्षेत्रात पडलेल्या दमदार पावसामुळे भीमा खोऱ्यातील उजनीवरील अठरा धरणांमध्ये दमदार पावसाने हजेरी लावली.
एक महिना अगोदर दौंड येथून विसर्ग..
मागील वर्षी 26 जून रोजी उजनी पाणलोट क्षेत्रात 21 मिमी पाऊस झाला होता. एकूण 461 मिमी पावसाची नोंद झाली होती. तर 11 जुलैपासून दौंड येथून उजनी धरणामध्ये पाणी येण्यास सुरुवात झाली होती. यावर्षी एक महिना अगोदर दौंड येथून विसर्ग सुरू झाल्यामुळे पुणे, अहमदनगर, सोलापूर , जिल्ह्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे. नीरा खोऱ्यातील नीरा गुंजवणी, देवधर, नीरा, भाटघर , या धरण क्षेत्रामध्ये दमदार पाऊस झाला.