उसाचे क्षेत्र यंदा अवेळी पडलेल्या पावसामुळे घटलेले आहे त्यामुळे साखरेचे उत्पादन साहजिकच घटणार आहे. महाराष्ट्रात सरकारने ऊस निर्यात बंदी केल्यामुळे शेतकरी संघटना आक्रमक झाल्या असून अनेक ठिकाणी सरकार विरोधात निदर्शने आणि आंदोलने सुरू आहेत. शेतकऱ्यांच्या उसाला चांगला भाव मिळावा अशी त्यांची प्रमुख मागणी आहे.
दरम्यान येणाऱ्या 1 नोव्हेंबर पासून यंदाचा गळीप हंगाम सुरू होणार असल्याच्या चर्चा असल्या तरीही अजून गरीब हंगामाची अधिकृत तारीख ठरलेली नाही. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री समितीची बैठक होऊन यंदाच्या गळीप हंगामाची तारीख ठरली जाणार आहे. येत्या पाच ते सहा दिवसांमध्ये बैठक होणार असल्याची माहिती साखर संकुलनातील अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे.
साखर कारखाने ऑक्टोंबर मध्ये चालू करण्याची तीव्र स्पर्धा सोलापूर, पुणे या भागात आहे. या उलट मराठवाडा तसेच सांगली, सातारा, कोल्हापूर येथील कारखाने 15 नोव्हेंबर दरम्यान चालू होत असतात . परिणामी त्याचा ऊसदर आणि उतारा दोन्हीही जास्त आहे . हे इथे लक्षात घेतले गरजेचे आहे. 2023 – 24 चा गळीत हंगाम तोंडावर आहे. दुष्काळाच्या सावटाखाली येणारा हंगामानात्मक असणार आहे . दरवर्षी हंगामाच्या अगोदर कारखानदारी विषयक, विशेष मंत्री समितीची बैठक माननीय मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली होत असते . या बैठकीत पावसाचा आढावा, ऊस पिक उत्पादनाचा आढावा ,होणारे अंदाज गाळप, अंदाजे साखर उत्पादन ,हंगाम चालू करण्याची तारीख, मागील वर्षाची शेतकऱ्यांचे देणे, मुख्यमंत्री सहायता निधी ,आदी बाबींवर सविस्तर चर्चा होऊन सर्वसमावेशक धोरण तयार केले जाते. सदरचे धोरण अर्थातच सहकारी आणि खाजगी सर्व कारखान्यांना बंधनकारक असते.
राज्यात किती कारखान्यांना परवानगी?
राज्यात साधारण 211 चालू कारखाने आहेत. तर यावर्षी राज्यातून आतापर्यंत 217 कारखान्यांचे क्रॅशिंग अर्ज प्रशासनाकडे आलेले आहेत. गळीत हंगामाची तारीख जाहीर झाल्यानंतर या कारखान्यांना परवानगी देण्यात येणार आहे . अशी माहिती विकास शासकीय च्या सचिन बऱ्हाटे यांनी माहिती दिली आहे.
साखरेचे उत्पादन घटणार.
पश्चिम महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यातील ऊस शेतीला यंदा लांबलेल्या मान्सूनमुळे फटका बसला आहे . जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये पाऊस न पडल्यामुळे अनेक धरणाची पाणी पातळी पुरेशी नाही . सध्या मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झाला असून धरणे पूर्ण सक्षमतेने भरण्याची शक्यता कमी आहे. यामुळे ऊस आणि साखर उत्पादन घटणार असून केंद्र सरकार साखर निर्यातीवर बंदी आणण्याची शक्यता आहे.
”आम्ही मंत्री समितीला एक नोव्हेंबर ही तारीख दिली असून त्यांच्या बैठकीमध्ये हंगामाच्या शुभारंभाची तारीख ठरेल . परवानगीसाठी आमच्याकडे आत्तापर्यंत २१७ कारखान्यांचे अर्ज आले आहेत . उसाचे क्षेत्र कमी झाले असल्याने यंदा मार्च महिन्यापर्यंत गळीत हंगाम सुरू राहणार असल्याची शक्यता आहे . सचिन बऱ्हाटे ( विकास शाखा ,सहाय्यक संचालक,साखर आयुक्तालय)1