गहू पेरणीसाठी कोणते वाण निवडाल? जाणून घ्या सविस्तर ..

गहू पेरणीसाठी कोणते वाण निवडाल जाणून घ्या सविस्तर

गहू ही जगातील प्रमुख अन्नधान्याचे पीक असून त्याच्या लागवडीचे क्षेत्र व उत्पादन इतर अन्नधान्याच्या पिकापेक्षा अधिक आहे. जगातील निम्या लोकांच्या पोषणात गव्हाला  प्रमुख स्थान आहे.  त्यापासून चपाती व पाव तत्सम  पदार्थ ,रवा व मैदा ही पदार्थ तयार करता येतात.  गहू विशेषता उत्तर आणि दक्षिण समक्ष कटिबंधातील प्रदेशात पिकतो.  जगातील पेरणीसाठी गव्हाच्या सुधारित वाणांचा वापर झाल्यामुळे तसेच मशागतीच्या तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यामुळे महाराष्ट्राचे गव्हाचे सरासरी प्रति हेक्टर उत्पादन 482 किलो वरून 839 किलो पर्यंत वाढले आहे . 

बागायत वेळेवर पेरणी.

सरबती वाण- फुले समाधान,  एम.ए.सी.एस. ६२२२,त्र्यंबक, तपोवन, एम. ए. सी. एस. ६४७८.

फुले समाधान

हा वाण उशिरा पेरणीसाठी फार चांगला आहे.  यामुळे या वाणाची शिफारस बागायती उशिरा पेरणीसाठी करण्यात आलेली आहे.  उशिरा पेरणीसाठी  ए. के. ए. डब्ल्यु – ४६२७ हा वाणसुद्धा घेऊ शकता.पाण्याची कमतरता असल्यास  एन. आय. ए. डब्ल्यु – १४१५ (नेत्रावती) व एच. डी. २९८७ (पुसा बहार) या सरबती वाणांची लागवड करावी.

बन्सी बक्षी वाण

एन. आय. डी. डब्ल्यु – २९५ (गोदावरी) हा बक्षी वाण बागायती वेळेवर पेरणी करण्यासाठी वापरावा. एम. ए. सी. एस. ४०२८, एम. ए. सी. एस. ४०५८.

खपली गहू

खपली गव्हाची लांब अरुंद दाणे असतात.  आणि सामान्यता याचा वापर रवा ,खीर नाश्त्याचे पदार्थ तयार करण्यासाठी केला जातो.  आहारतंतूंचे  प्रमाण इतर गव्हाच्या तुलनेत पण जास्त असते (16% पेक्षा जास्त)  खपली गव्हाच्या खाद्यपदार्थांमध्ये ग्लायकॅमिक निर्देशांक कमी असतो.  ज्यामुळे त्याला मधुमेहाच्या रुग्णांच्या आहारात समाविष्ट केले जाते. वाण: एम. ए. सी. एस. २९७१.

नवीन प्रसारीत वाण
फुले समाधान बहुगुण गहू वाण (एन. आय. ए. डब्ल्यु. १९९४)

प्रसारणाचे वर्ष : २०१६

महाराष्ट्रातील बागायती क्षेत्रात वेळेवर 1 ते 15  नोव्हेंबर तसेच उशिरा 15 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीमध्ये पेरणीसाठी सरबती  गव्हाचा समाधान (एन. आय. ए. डब्ल्यु. १९९४)  हा वान प्रसारित करण्यात आला आहे. 

महाराष्ट्रातील बागायती क्षेत्रामध्ये वेळेवर किंवा उशिरा अशा दोन्ही कालावधीत पेरणीसाठी एन. आय. ए. डब्ल्यु 1994 सरबती गव्हाचा हा एकमेव वाण आहे. वेळेवर पेरणी खाली उत्पन्न 46.12 क्विंटल /हेक्टर तर उशिरा पेरणीसाठी उत्पन्न 44.23 क्विंटल/ हेक्टर.

– तपोवन, एम. ए. सी. एस. ६२२२, एन. आय. ए. डब्ल्यु. – ३४ व एच. डी. – २९३२ या तुल्य व प्रचलित वाणांपेक्षा सरस.

मावा किडीस तसेच  तांबेरा रोगास देखील प्रतिकारक्षम.

टपोरी व आकर्षक दाने हजार दाण्यांची वजन 43 ग्रॅम प्रथिनांचे प्रमाण 12.5 ते 13.8% चपातीची उत्कृष्ट व प्रचलित वाणापेक्षा सरस.

प्रचलित वाणापेक्षा नऊ ते दहा दिवस लवकर येतो.

फुले सात्विक (एन.आय.ए.डब्ल्यु. ३१७०)

संरक्षित पाण्याखाली पेरणीसाठी फुले सात्विक (एन. आय. ए. डब्ल्यु. ३१७०) हा वाण (महाराष्ट्र व कर्नाटक) आणि उत्तर पश्चिम मैदानी प्रदेश विभागात प्रसारित करण्यात आला आहे.
प्रसारणाचे वर्ष : २०१९
ठळक वैशिष्ट्ये:

-उत्कृष्ट गुणवत्तेसाठी प्रसारित वाण.

– चपातीचा गुणवत्ता स्कोर हा ७.० ते ७.५ व यामध्ये झिंक ३० ते ३५ पीपीएम आहे.यामध्ये लोहाचे प्रमाण हे ३५ ते ४० पीपीएम इतके असुन तसेच हा वाण तांबेरा रोगास प्रतिकारक्षम असतो . ३५ ते ४० क्विंटल प्रति हेक्टरी त्याची उत्पादनक्षमता एका ओलिताखाली इतकी असते .

– प्रथिनांचे प्रमाण ११ ते १२ टक्के, बिस्किट स्प्रेड मानक १० पेक्षा जास्त.- दाण्याचा कडकपणा खुप कमी म्हणजे (३० ते ४५%) तसेच ब्रेड गुणवत्ता स्कोर ७.० ते ७.५० व ग्लूटेन इंडक्स ८० ते ८५ टक्के असते.

एन. आय. डी. डब्ल्यु. ११४९
प्रसारणाचे वर्ष : २०२०
ठळक वैशिष्ट्ये:

– द्विपकल्पीय विभागातील जिरायतीत किंवा एका ओलिताखाली (एक पाणी पेरणीनंतर ४२ दिवसांनी) वेळेवर पेरणीसाठी शिफारशीत बन्सी वाण.

– तांबेरा रोगास प्रतिकारक.

– उत्पादनक्षमता ३५ ते ४० क्विंटल/हे.

– पक्व होण्याचा कालावधी ११०-११५ दिवस.

– शेवया, कुरड्या व पास्ता यासाठी उत्तम.

वरील प्रमाणे पेरणीच्या वेळेनुसार सुधारित वाणाचा अवलंब केल्यास निश्चित उत्पादनात वाढ होईल पेरणीची वेळ सुरक्षित पाण्याखाली घेण्यात येणाऱ्या गव्हाची पेरणी एक ते दहा नोव्हेंबर मध्ये करावी बागायती गव्हाची वेळेवर पेरणीची योग्य वेळ म्हणजे नोव्हेंबर च्या पहिल्या पंधरवाडा मुळे या कालावधीमध्ये पेरणी केल्यास गव्हाचे उत्पादन चांगले येते बागायती गव्हाची पेरणी सुद्धा उशिरा करता येते परंतु वेळेवर पेरणी केल्यास गव्हाची उत्पादन चांगले होते बागायती गव्हाची पेरणी 15 नोव्हेंबर नंतर उशिरा केल्यास प्रत्येक पंधरवड्याची तरी 2.5 क्विंटल उत्पादन कमी येते त्यामुळे 15 डिसेंबर नंतर पेरलेले गव्हाचे पीक फायदेशीर ठरत नाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *