Soyabin Rate : देशातील सोयाबीन शेतकऱ्यांना ब्राझील तंत्राचा लाभ होणार?

Soyabin Rate : सध्या देशात सोयाबीनचे दर उत्पादन खर्चाच्या तुलनेत कमी मिळत आहेत. अनेक बाजारांमध्ये सोयाबीनचा दर प्रति क्विंटल ३५०० ते ४२०० रुपयांदरम्यान आहे, जे की शेतकऱ्यांच्या अपेक्षेपेक्षा कमी आहेत. यामुळे उत्पादन वाढूनही नफा न मिळाल्याने अनेक शेतकरी अडचणीत आले आहेत. या पार्श्वभूमीवर भारताचे कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांचा नुकताच झालेला ब्राझील दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.

ब्राझील जगातील अग्रगण्य सोयाबीन उत्पादक देशांपैकी एक आहे. त्यांनी मोठ्या प्रमाणावर यांत्रिकीकरण, उन्नत बियाणे, सिंचन पद्धती आणि प्रक्रिया उद्योग उभारून सोयाबीनला जागतिक बाजारपेठ मिळवून दिली आहे. या तंत्रज्ञानाचा अनुभव घेण्यासाठी भारताच्या वतीने चौहान यांनी ब्राझीलमधील सोयाबीन उत्पादन प्रकल्पांना भेट दिली.

या दौऱ्यादरम्यान भारत आणि ब्राझीलने सोयाबीन उत्पादन, प्रक्रिया आणि निर्यातीसाठी संयुक्त उपक्रम सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली. यामुळे भारतीय शेतकऱ्यांना ब्राझीलच्या तंत्रज्ञानाचा थेट लाभ मिळू शकतो. सुधारित बियाणे, आधुनिक मशीनरी, कमी पाण्यात जास्त उत्पादन देणाऱ्या पद्धती, तसेच अन्न प्रक्रिया केंद्रांची उभारणी यामुळे सोयाबीनचे मूल्यवर्धन होईल.

प्रक्रिया उद्योग वाढल्यास बाजारात कच्च्या सोयाबीनला दर न मिळाल्याची समस्या टळू शकते. तेल, कणिक, पशुखाद्य यासाठी सोयाबीनचे स्थानिक पातळीवर रूपांतर केल्यास मागणी वाढेल आणि शेतकऱ्यांना चांगला भाव मिळू शकतो. याशिवाय निर्यातीस चालना मिळाल्यास दर स्थिर राहतील.

सध्या सोयाबीन उत्पादक शेतकरी बाजारभावामुळे हवालदिल आहेत. मात्र ब्राझील दौऱ्यानंतर जर ही तांत्रिक भागीदारी प्रत्यक्षात आली, तर उत्पादन खर्च कमी करून नफा वाढवण्याचा मार्ग खुला होऊ शकतो. यामुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि सोयाबीन शेती अधिक फायदेशीर बनू शकेल.