Price of Sugar : सध्या साखरेचा किमान बाजार मूल्य (MSP) ₹3100 प्रति क्विंटल आहे, आणि राज्य सरकारने केंद्र सरकारकडे तो ₹4100 पर्यंत वाढवण्याची शिफारस केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील ऊस गाळप हंगाम धोरण बैठकीत ही मागणी पुढे आली असून, 20 ऑक्टोबरला केंद्रीय अन्न व ग्राहक संरक्षण मंत्रालयाला पत्र पाठवण्यात आले आहे.
📈 साखरेच्या दरवाढीमागील कारणं:
उत्पादन खर्च वाढला आहे, त्यामुळे साखर कारखान्यांना आर्थिक अडचणी येत आहेत.
ऊसाचा FRP (Fair and Remunerative Price) ₹340 वरून ₹355 प्रति क्विंटल करण्यात आला आहे, पण साखरेचा MSP मात्र 2019 पासून स्थिर आहे.
साखर उद्योग आणि शेतकरी संघटनांनी MSP वाढीची जोरदार मागणी केली आहे, ₹3914 ते ₹4200 प्रति क्विंटल पर्यंत.
भारतातील साखर उत्पादन आणि साठा:
2025-26 या विपणन वर्षात साखरेचं उत्पादन 34.9 दशलक्ष मेट्रिक टन होण्याची शक्यता आहे.
देशांतर्गत वापर 28.5 ते 29 दशलक्ष मेट्रिक टन पर्यंत वाढू शकतो.
सुरुवातीचा साठा 5 दशलक्ष मेट्रिक टन असेल, जो मागील वर्षी 8 दशलक्ष होता.
भारत हा जगातील साखर उत्पादनाच्या क्षेत्रात अग्रगण्य देश असून, दरवर्षी येथे मोठ्या प्रमाणात साखरेचं उत्पादन केलं जातं. देशातील महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि गुजरात या राज्यांमध्ये ऊसाचं प्रचंड क्षेत्र आहे, ज्यामुळे साखर उद्योगाला मोठा आधार मिळतो. भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा साखर उत्पादक देश आहे आणि आपल्या गरजा पूर्ण केल्यानंतर देश मोठ्या प्रमाणात साखरेची निर्यातही करतो. मागील वर्षी काही राज्यांमध्ये ऊसाचं क्षेत्र घटल्यामुळे गळीत हंगाम कमी कालावधीचा झाला आणि उत्पादनात काही प्रमाणात घट झाली. मात्र, यावर्षी ऊस लागवडीचं क्षेत्र वाढल्याने उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या वाढत्या उत्पादनामुळे साखर उद्योगाला बळ मिळेल आणि देशाच्या अर्थव्यवस्थेलाही सकारात्मक चालना मिळेल.












