मोठी बातमी, शासनाकडून 5 रुपये अनुदानासहित, आता दुधाला मिळणार इतका दर,वाचा सविस्तर ..

दुधाला प्रतिलिटर 30 रुपये स्थायीभाव दिला जाणार आहे तर 5 रुपये शासनाकडून अनुदान मिळणार आहे . त्याचबरोबर सरकारकडून विधानसभा सभागृहात दूध भुकटी निर्यातीस प्रोत्साहन मिळावे यासाठी सुद्धा शासनाकडून प्रतिकिलो 30 रुपये अनुदान देणाचा निर्णय घेण्यात आला. मंत्री विखे पाटील यांनी सांगितले की 1 जुलै पासून दुधाचे नवीन दर राज्यभर लागू होतील .

दूध भुकटी आणि बटरचे दर आंतरराष्ट्रीय बाजारात कमी झाल्यामुळे राज्यातील दूध खरेदी दरावर त्याचा परिणाम झाला होता. यामुळे दूध उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात आले होते. दुग्ध व्यवसाय व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही बाब लक्षात घेऊन , दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून सोमवारी दूध उत्पादक शेतकरी व राज्यभरातील सहकारी तथा खासगी दूध उत्पादक संघ यांची मंत्रालयात तातडीची बैठक बोलावली होती. सदर बैठकीत आमदार विनायक कोरे, आमदार मंगेश चव्हाण,आमदार मोनिका राजळे तसेच राष्ट्रीय डेरी विकास बोर्डाचे अध्यक्ष डॉ. मिनेश शहा आमदार शिवाजीराव क्रडिले, माजी आमदार सदाभाऊ खोत, आदी मान्यवर उपस्थित होते.

दूध उत्पादक शेतकरी, आणि दूध संघाच्या समस्या या बैठकीत मंत्री विखे पाटील यांनीजाणून घेतल्या आणि त्यांच्या मागण्या विचारात घेता शेतकऱ्यांना प्रतिलिटर 30 रु. भाव राज्यातील सर्व खासगी तथा सहकारी दूध संघाने देण्याचे सर्वानुमते निश्चित केल्याचे सभागृहाला सांगितले. त्यानंतर दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात शासन 5 रुपये प्रतिलिटरचे अनुदानवर्ग करेल.ज्यामुळे शेतकऱ्याला प्रतिलिटर 35 रुपये मिळून दिलासा मिळेल असे मंत्री विखे पाटील म्हणाले.

आंतरराष्ट्रीय बाजारात बटरची व दूध पावडरची मागणी गेल्या काही दिवसांपासून कमी झाल्यामुळे त्यांचे भाव कमी होत आहेत .त्यामुळे राज्यात दूध पावडरचा मोठा साठा उरलेला आहे. त्यामुळे राज्यातील जे दूध प्रकल्प भुकटी निर्यात करतात त्यांना प्रोत्साहन म्हणून प्रतिकिलोसाठी 30 रुपये अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.अनुदानाची मर्यादा 15 हजार मॅट्रिक टन इतकी असेल. तसेच शेतकऱ्यांची अनुदान प्रणाली सोपी व अधिक साधी करण्यात येईल . ज्या शेतकऱ्यांचे अनुदान रखडले आहे त्यांच्यासाठी 15 जुलै पर्यंत शासनाच्या संकेतस्थळावर माहिती अद्यावत करण्याची मुदतवाढ सुद्धा देण्यात आल्याचे मंत्री महोदयांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *