तुम्हाला जमिनीचा नकाशा हवा आहे का ? मग ‘या’ पद्धतीने 2 मिनिटात मोबाईलवरच मिळवा ऑनलाईन नकाशा…

शेतकऱ्यांना जमिनीची मोजणी करणे आणि नकाशा मिळवण्याची कामे खूप किचकट वाटत असतात त्यासाठी जास्त वेळा हेलपाटे मारावे लागतात. शेतकऱ्यांचे हेच हेलपाटे बंद व्हावेत, याकरिता राज्य शासनाने अक्षांश-रेखांश आधारित नकाशे वाटण्यास मान्यता दिली आहे.

राज्यातील १०६ तालुक्यांमध्ये अक्षांश-रेखांश आधारित जमीन मोजणीची कामे भूमि अभिलेख संचालनालयाने घेतलेल्या पुढाकारानुसार आता केली जात आहेत. या भागा मधील शेतकरी व नागरिकांना अक्षांश-रेखांश आधारित नकाशे वाटण्यात येत आहेत .

त्यामुळे यापुढे कधीही नकाशा हरविला तरी आता शासन दफ्तरी एक इंचही जमीन मागे पुढे होणार नाही. शेतकरी आपआपल्या मोबाईल द्वारे नकाशे मिळवू शकणार आहेत. अक्षांश-रेखांश नमुद केल्यामुळे आता शेतकरी पुनःपुन्हा घर बसल्या जमीन मोजणीच्या अगोदर किंवा मोजणीच्या नंतर जमिनीचे नकाशे प्राप्त करू शकतात .

जमीन मोजणी केल्या नंतर प्रत्येकाच्या जमिनीची हद्द ठरते. विशेष म्हणजे पोटहिस्से झाल्यानंतर पुन्हा मोजणी करुन आपआपसात जमिनीची हद्द ठरवून घेतली जाते . या कामात अनेकदा अडचणी येतात . त्यामुळे ग्रामस्थ, शेतकऱ्यांकडून भूमि अभिलेख खात्याकडे चुकीची जमीन मोजणी व हद्दीच्या वादाबाबत सातत्याने तक्रारी येतात. आधी राज्यभर जुनाट ईटीएस (इलेक्ट्रॉनिक्स टोटल स्टेशन्स मशीन्स) मोजणीसाठी उपकरण वापरले जात होते . त्याच्या मदतीने एका दिवसात एक कर्मचारी केवळ एकाच ठिकाणीची मोजणी करीत असे.

जमीन मोजणीच्या कामकाजात कमालीचे बदल भूमि अभिलेख संचालक नि.कु.सुधांशू यांनी घडवून आणले आहेत. त्यांनी ‘कॉर्स’ (कंन्टिन्यूस ऑपरेशन रेफरन्स स्टेशन) प्रणालीच्या मदतीने राज्यात मोजणीची कामे सुरू केली. कॉर्समुळे ‘जीपीएस’ नोंदी जलद घेता येतात. कॉर्सला ‘रोव्हर’(उपग्रह प्रणालीशी जोडलेले भूमापन उपकरण) जोडले गेल्यामुळे मोजणी पटकन व अचूक होऊ लागली आहे. . रोव्हरची उपयुक्तता लक्षात आल्यामुळे राज्यभर विदेशी बनावटीचे रोव्हर उपलब्ध करुन देण्यासाठी श्री. सुधांशू यांनी पाठपुरावा केला आहे.

‘‘उपग्रहाशी थेट रोव्हर जोडलेला असल्यामुळे क्षणात अक्षांश रेखांशसह (कॉर्डिनेटस्) मोजणी होते. जमीन मोजणी गेल्या एक वर्षांपासून रोव्हर व कॉर्सच्या मदतीने यशस्वीपणे होत असल्याचे भूमि अभिलेख संचालनालयाने सिद्ध केले. त्यानंतर आता या प्रणालीच्या आधारावर १०६ तालुक्यांमध्ये जमीन मोजणीची कामे सुरू करण्यात आली आहेत. या तालुक्यामधील शेतकऱ्यांना अक्षांश-रेखांश आधारित जमीन मोजणी नकाशे मिळतील,’’ असे सूत्रांनी स्पष्ट केले.

असे होत आहेत बदल.. 

– जमीन मोजणी आता इलेक्ट्रॉनिक्स उपकरणाऐवजी कॉर्स व रोव्हर प्रणालीतून .

– मोजणी झाल्यावर नकाशाची क प्रत पुरवली जाते. त्यावर आता अक्षांश व रेखांश आकडे दिले जातील.

– अक्षांश व रेखांश दिल्यामुळे आता हद्द चोरणे तसेच हद्दीत अंतर पडणे असे वाद कायम स्वरूपी बंद होतील.

-सामान्य नागरिकांना अक्षांश व रेखांशासहित थेट संकेतस्थळावर नकाशे मिळतील.

– सध्या अक्षांश व रेखांशासह संकेतस्थळावर विशिष्ट तालुक्यांचे नकाशे मोफत उपलब्ध.

– शेतकऱ्यांना सर्वसमावेशक सुविधा देण्याचा शासनाचा प्रयत्न https://bhumiabhilekh.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर आहे.

शेतकऱ्यांना एकदा जमिनीची मोजणी झाल्यानंतर नकाशासाठी हेलपाटे मारण्याची गरज राहणार नाही. आम्ही अक्षांश-रेखांश आधारित १०६ तालुक्यांमध्ये नकाशांची कामे सुरू केली आहेत. यात पुढील तीन महिन्यांत अजून १२५ तालुक्यांचा समावेश होईल . या वर्षाअखेरीस पूर्ण राज्यात ही योजना लागू करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
– नि. कु. सुधांशू , संचालक, भूमि अभिलेख. 

Leave a Reply