धान्याऐवजी रेशन कार्ड धारकांच्या खात्यावर जमा होणार 9 हजार रुपये

मित्रांनो राज्य सरकार नेहमीच सामान्य लोकांसाठी नवनवीन योजना आणि मोहीम राबवत असते. जेणेकरून गरजू आणि योग्य लोकांपर्यंत सर्व सुविधा नियमित पोहोचाव्यात. अशांपैकी खूप काळापासून चालत आलेली सुविधा म्हणजे रेशन मिळणे.

रेशनकार्ड धारकांना दरमहा किंवा तिमाही धान्य कमीत कमीत दरात उपलब्ध करण्यात येते. यामध्ये गहू, तांदूळ, डाळ अशा धान्यांचा प्रामुख्याने समावेश असतो. कोरोना काळात तीन महिने हे धान्य मोफत देण्यात आले होते. दरम्यान आता रेशन कार्डधारकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. रेशनकार्ड असणाऱ्या व्यक्तीच्या खात्यावर आता वार्षिक ९ हजार रुपये जमा होणार असल्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे.

आपल्या राज्यात अनेक लोक असे आहेत जे मोलमजुरी अन्यतर कामे करून आपला उदरनिर्वाह करत असतात. ज्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. कधीकधी तर त्यांना पोटभर अन्न मिळणेदेखील कठीण होऊन जाते. अशा गरजू आणि असहाय लोकांचा विचार करून ही योजना आखण्यात आली आहे. या योजेअंतर्गत रेशन धान्य ऐवजी वर्षाला एकूण 9 हजार रुपये लाभार्थीच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहेत. 

राज्य सरकारने ही योजना राज्यातील १४ आत्महत्या ग्रस्त जिल्ह्यामध्ये रेशन गहू आणि तांदूळ प्रती २ रुपये किलो अशा स्वरूपात मिळत होते. पण परंतु ही योजना बंद झाल्यामुळे योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये नाराजी स्पष्ट झाली. जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त भागातील अनेक गरजू व्यक्तींचे जगणे केवळ राज्य सरकारकडून मिळणाऱ्या या रेशनच्या भरोशावर होते. परंतु शासनाने अचानक ही योजना बंद केल्यामुळे अनेकांचे हाल झाले होते. ही परिस्थिती लक्षात घेता आता राज्य सरकारने महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय जाहीर केला आहे, या निर्णयानुसार आता राज्यातील १४ आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील रेशन धारकांना धान्यऐवजी पैसे मिळणार आहेत.

या योजनेच्या अंतर्गत कुटुंबातील एका व्यक्तीला एका महिन्यासाठी १५० रुपये मिळणार आहेत. यानुसार जर तुमच्या कुटुंबात पाच व्यक्ती असतील तर तुम्हाला महिन्याला ७५० रुपये मिळतील. आणि या हिशोबाने लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर वार्षिक ९ हजार रुपये जमा होतील.

दरम्यान एक महत्वाची गोष्ट म्हणजे या योजनेअंतर्गत कुटुंबातील महिलेच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा करण्यात येणार आहे. त्यानुसार लाभार्थी या रकमेचा वापर रेशन धान्य खरेदी करण्यासाठी करू शकतात किंवा त्यांच्या गरजेनुसार कोणत्याही कामासाठी हे पैसे वापरू शकतात.

source-mahasarkarvarta

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *