नाफेडची खरेदी, उत्पादन घटीचा हरभऱ्याला आधार

देशातील बाजारात सध्या हरभऱ्याचे दर दबावात आहेत. तर नाफेड महत्वाच्या राज्यांमध्ये खरेदी सुरु करणार आहे. कर्नाटक आणि गुजरातमध्ये नाफेडची खरेदी सुरु झाली.

 देशातील बाजारात सध्या हरभऱ्याचे दर (Chana Rate) दबावात आहेत. तर नाफेड (NAFED) महत्वाच्या राज्यांमध्ये खरेदी सुरु करणार आहे. कर्नाटक आणि गुजरातमध्ये नाफेडची खरेदी सुरु झाली. तसेच नाफेडने स्टाॅकमधील हरभरा विक्री (Chana Procurement) थांबवली. त्यामुळं दराला आधार मिळताना दिसतोय. 

देशातील बाजारात सध्या तूर, उडीद आणि मुगाचे दर तेजीत असल्याने डाळीही महागल्या आहेत. त्यामुळे हरभरा डाळिला उठाव असल्याचे व्यापारी सांगत आहेत.

त्यातच नाफेडने आपल्याकडील साठ्यातील हरभरा विक्री थांबवली. त्यामुळे हरभार दरात क्विंटलमागं १०० ते २०० रुपयांची सुधारणा दिसत आहे.

तर नाफेडने गुजरात आणि कर्नाटकात नव्या हंगामातील हरभऱ्याची खरेदी सुरु केली. तर पुढील काही दिवसांमध्ये मध्य प्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्रातही खरेदी सुरु होईल.

त्यामुळे हरभरा दराला आधार मिळू शकतो, असाही अंदाज अभ्यासक व्यक्त करत आहेत. 

नाफेडने स्टाॅकमधील हरभरा विक्री बंद केल्यामुळे दरात सुधारणा पाहायला मिळत आहे.

सध्या कर्नाटकात हरभऱ्याला सरासरी ४ हजार ४०० ते ५ हजार १०० रुपये भाव मिळतोय. तर गुजरातमध्ये ४ हजार ५०० ते ५ हजार २०० रुपये भाव मिळतोय.

महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये सरासरी ४ हजार ६०० ते ५ हजार रुपयांचा भाव आहे. देशात नाफेडची खरेदी सुरु झाल्यानंतर दरात सुधारणा होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

देशात यंदा तूर आणि उडदाचे उत्पादन घटले. त्यामुळे तूर आणि उडीद डाळिचे दरही तेजीत आहेत. त्यामुळे स्वस्त असलेल्या हरभरा डाळिला उठाव आहे.

सध्या हरभरा डाळ ६० ते ७० रुपये प्रतिकिलो आहे. तर तुर डाळ ११५ ते १२० रुपयांच्या दरम्यान आहेत. तुरीचे उत्पादन घटल्याने भाव आणखी वाढण्याचा अंदाज आहे. 

हरभऱ्याचे दरही यंदा किती पुरवठा होतो यावर अवलंबून आहेत. देशात यंदा गेल्यावर्षीपेक्षा जास्त उत्पादन होईल, असे केंद्र सरकारने म्हटले आहे.

पण अनेक भागात हरभऱ्याला उतारा कमी आहे. त्यामुळं उत्पादकता २० टक्क्यांपर्यंत घटल्याचे शेतकरी सांगत आहेत. तर नाफेडकडील स्टाॅक १० लाख टनांच्या दरम्यान शिल्लक असल्याचेही जाणकार सांगत आहेत. 

देशातील उत्पाद सरकारच्या अंदाजापेक्षा कमीच राहील, असे व्यापारी आणि उद्योगाने स्पष्ट केले. नाफेडकडील साठाही घटला.

त्यामुळं नाफडने नव्या हंगामातील हरभरा खरेदी केल्यानंतर खुल्या बाजारातील दरही सुधारतील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला. 

source-agrowon

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *