नुकत्याच राज्यातील बाजार समितीच्या निवडणूका पार पडल्या आहेत ,पण तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल खरंच बाजार समित्या इतक्या महत्वाच्या आहेत का? तर त्याच उत्तर आहे हो आहेत, शेती अभ्यासक दीपक चव्हाण सरांनी बाजार समित्या का महत्वाच्या आहेत त्याची पाच महत्वाची कारणे सांगतली आहेत.
१) प्राईस म्हणजे भाव ठरवणे : बाजारसमिती मध्ये विविध ठिकाणचा शेतकऱ्यांचा माल येत असतो ,येणाऱ्या आवक वरून आणी मार्केट मधील मागणी वरून मालाच्या प्रत नुसार मालाचे दर ठरवले जातात, त्यामुळे आजच्या इंटरनेट च्या जगात शेतकऱयांना मार्केट मध्ये कोणत्या मालाला काय रेट आहे हे समजत.
२) सर्व प्रकारच्या दर्जाचा माल विकता येतो : शेतीमध्ये पिकणारा माल हा कधीच एक समान दर्जाचा नसतो काही माल खुप चांगला तर काही माल चांगला , काही मध्यम तर काही कमी दर्जाचा असतो. आशा सर्व दर्जाचा माल बाजार समिती मध्ये व्यापाराना विकता येतो.
३) पैश्याची हमी: बाजार समिती मध्ये विकलेल्या मालाचे पैसे खात्रीशीर मिळतात, पैसे बुडण्याची भीती राहत नाही.
४) एक अधिकारशाही पासून रक्षण : बाजार समितीमुळे खाजगी व्यापारी व खाजगी कंपन्यांची एकअधिकार शाही राहत नाही.त्यामुळे शेतकऱ्यांना मालाला योग्य दर मिळतो
५) सीजन नसताना विक्री : बाजार समितीमध्ये देशातील विविध भागातून व्यापारी येत असतात त्यामुळे वर्षभर सीजन नसताना देखील मालाची खेरेदी विक्री चालू राहते
तर वरील सर्व मुद्दे वाचल्यावर तुमच्या लक्ष्यात आले असेलच बाजार समितीचा रोल किती महत्वाचा आहे ते.