किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता

पुणे : राज्याच्या उत्तरेकडील भागाच्या किमान तापमानात घट झाल्याने गारठा कायम आहे. उत्तर महाराष्ट्रातील निफाड, धुळे येथे पारा १० अंशांच्या खाली कायम आहे. आजपासून (ता. २७) राज्याच्या किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
सोमवारी (ता. २६) उत्तर महाराष्ट्रातील निफाडच्या गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी ६.८ अ���श सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. धुळे येथील कृषी महाविद्यालयात ८.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. उर्वरित राज्यात किमान तापमानाचा पारा १० ते २० अंशांच्या दरम्यान कायम होता. राज्याच्या किमान तापमानात हळूहळू वाढ होत आहे.
स्वच्छ सूर्यप्रकाश जमिनीवर येत असल्याने राज्यात उन्हाचा चटका जाणवत आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रातील सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३३.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यातही बहुतांश ठिकाणी कमाल तापमान सातत्याने ३० अंशांच्या पार आहे. श्रीलंकेच्या किनाऱ्याजवळ आणि लगतच्या कोमोरीन भागा असलेल्या कमी दाब क्षेत्राची तीव्रता कमी होत आहे. ही प्रणाली आग्नेय अरबी समुद्राकडे सरकण्याची शक्यता आहे.


उत्तर भारतात थंडीची तीव्र लाट आली आहे. राजस्थानातील चुरू येथे सोमवारी (ता. २६) देशाच्या सपाट भूभागावरील यंदाच्या हंगामातील नीचांकी तापमान नोंदले गेले. चुरू येथे शून्य अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पंजाब, हरियाना, चंडीगड, दिल्ली आणि उत्तर राजस्थानमध्ये थंडीच्या लाटेचा इशारा आहे. तर उत्तराखंड पंजाब, हरियाना, चंडीगड आणि राजस्थानमध्ये येथे थंड दिवस अनुभवायला मिळणार आहे. तर वरील राज्यांसह ओडिशा, आसाम, मेघालय, नागालॅण्ड आणि मणीपूर राज्यात दाट धुक्याची स्थिती राहणार आहे.


🌡️सोमवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) : पुणे ३१.२ (१२.१), जळगाव ३०.२ (१३.५), धुळे २८.० (८.४), कोल्हापूर – (१७.७), महाबळेश्वर २६.३(१४.०), नाशिक ३०.७ (१०.२), निफाड २९.८ (६.८), सांगली ३१.४ (१५.६), सातारा ३१.८(१२.९), सोलापूर ३३.५ (१९.४), सांताक्रूझ २९.०(१६.०), डहाणू २८.९ (१५.२), रत्नागिरी ३०.७ (१७.६), औरंगाबाद ३०.५ (११.०), नांदेड – (१७.२), परभणी ३१.२ (१६.४), अकोला ३२.४ (१७.४), अमरावती ३१.६ (१६.०), बुलडाणा २९.८ (१६.८), ब्रह्मपुरी ३२.४ (१५.५), चंद्रपूर २९.८ (१७.४), गडचिरोली २९.६(१३.४), गोंदिया २९.६(१५.२), नागपूर ३०.३ (१५.३), वर्धा ३१.१(१६.५), यवतमाळ ३१.५ (१६.५)

सौजन्य : अॅग्राेवन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *