महाराष्ट्रात तयार होत आहेत तब्बल 14 नवीन महामार्ग, दिल्ली-मुंबई ते मुंबई-पुणे….

महाराष्ट्रात तयार होत आहेत तब्बल 14 नवीन महामार्ग, दिल्ली-मुंबई ते मुंबई-पुणे….

सध्या महाराष्ट्र मध्ये रस्त्याच्या विकासाची कामे सुरू आहेत वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध महामार्गाची कामे चालू आहे. १४ नवीन महामार्ग तयार करण्यात येणार आहे.

यामध्ये काही रस्त्यांची कामे चालू आहेत तर काही रस्त्यांची कामे सुरू होण्याच्या मार्गावर आहेत. तसेच मुंबई ते नागपूर यादरम्यान समृद्धी महामार्गाचे जवळपास 70 टक्के काम पूर्ण झालेले आहे . गेल्या वर्षी नागपूर ते शिर्डी हा महामार्ग खुला झालेला आहे . तसेच शिर्डी ते भरवीर हा महामार्ग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सुरू करण्यात आलेला आहे.

या महामार्गांची कामे आहेत सुरु.

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग : प्रवाशांना या महामार्गाचा  नागपूर ते शिर्डी हा 520 किलोमीटर तसेच शिर्डी ते भरवीर 80 किलोमीटरचा टप्पा खुला करण्यात आलेला आहे. 701 किलोमीटर या महामार्गाची एकूण लांबी असून राहिलेले शंभर किलोमीटर लांबीचे काम लवकरच पूर्ण होणार आहे

दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे : देशाची राजधानी असलेली दिल्ली यामधील हा अतिशय महत्त्वाचा महामार्ग आहे . तो आठ पदरी महामार्ग असून त्याची लांबी जवळपास 170 किलोमीटर एवढी आहे.

जालना नांदेड समृद्धी महामार्ग कनेक्टर:  १७९ किलोमीटर लांबीचा जालना ते नांदेड हा महामार्ग विकसित केला जाणार आहे तो सहा पदरी असणार आहे तसेच तो समृद्धी महामार्गाला कनेक्ट केला जाणार आहे त्यामुळे मराठवाड्याची विदर्भासोबत असलेली कनेक्टिव्हिटी आणखीन सुधारण्यात येणार आहे महामार्ग चे काम नक्कीच जलद गतीने पूर्ण होईल .

नागपूर-गोवा शक्तिपीठ एक्सप्रेस वे :- नागपूरगोवा यामधील महामार्ग तयार केला जाणार आहे हा महामार्ग समृद्धी मार्ग पेक्षा जास्त लांबीचा राहणार असून हा महामार्ग महाराष्ट्रातील सर्वात अधिक लांबीचा बनलेला असणार आहे याची लांबी 760 किलोमीटर राहणार असून हा एक सहा पदरी महामार्ग आहे आता सध्या ग्राउंड वर्क सुरू असल्याची माहिती मिळालेली आहे महामार्गाचे वैशिट्ये म्हणजे हा महामार्ग तीन शक्तीपीठांना कनेक्ट करणार आहे याशिवाय इतर तीर्थस्थळांना देखील जोडणारा हा महामार्ग असणार आहे यामुळे त्याला शक्तीपीठ एक्सप्रेस असे म्हटलेले आहे

पुणे छत्रपती संभाजीनगर ग्रीन फिल्ड एक्सप्रेस वे: पश्चिम महाराष्ट्र सोबत मराठवाड्याची कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी हा महामार्ग विकसित करण्याचा प्लॅन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे याची लांबी 225 किलोमीटर राहणार असून सहा पदरी महामार्ग हा राहणार आहे याचे काम सुरू असल्याचे सांगितले जात आहे

चिरले ते पत्रा देवी कोकण एक्सप्रेस वे :
हा 
महामार्ग कोकण वासियांसाठी अतिशय सोयीस्कर राहणार आहे यामुळे कोकणची कनेक्टिव्हिटी सुधारणार आहे या महामार्गाची लांबी 500 किलोमीटर असणार आहे तसेच सहा पदरी हा महामार्ग राहणार आहे महामार्गाचा ग्राउंड सर्विस सुरू आहे

विरार अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडोर :  या महामार्ग ची विशेष म्हणजे हा पहिला राज्यातील 14 पदरी महामार्ग असणार आहे 126 किलोमीटर याची लांबी राहणार आहे यामुळे विरार ते अलिबाग हा प्रवास सोयीस्कर होणार आहे मुंबई उपनगरातील कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी हा महामार्ग योग्य राहणार आहे.

पुणे बेंगलोर एक्सप्रेस वे : महामार्ग हा आठ पदरी असून त्याची लांबी 700 किलोमीटर असणार आहे या महामार्गामुळे पुणे आणि बेंगलोर यांची कनेक्टिव्हिटी सुधारण्यास मदत होणार आहे या महामार्गाचे देखील काम लवकरच सुरू होणार आहे

पुणे नाशिक एक्सप्रेस वे : पुणे आणि नाशिक हे दोन्ही महाराष्ट्रातील महत्त्वाचे शहरे आहेत याची कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी हा महामार्ग तयार करण्यात येत आहे या महामार्गाची लांबी 180 किलोमीटर असून हा महामार्ग सहा पदरी असणार आहे या महामार्गाचा ग्राउंड सर्विस सुरू आहे

चेन्नई ग्रीन फिल्ड महामार्ग : हा महामार्ग सहा पदरी असून लांबी 400 किलोमीटर आहे परंतु या महामार्गाला सोलापूर शेतकऱ्यांनी विरोध दाखवला आहे

नागपूर विजयवाडा महामार्ग : नागपूर व विजयवाडा या दोन्ही शहरांना जोडण्यासाठी हा महामार्ग तयार करण्यात आलेला आहे याची काम लवकर सुरू करण्यात येईल

नागपूर गोंदिया महामार्ग : गोंदिया ही दोन्ही शहरे विदर्भामधील आहेत व या महामार्गामुळे ती एकमेकांना कनेक्ट होणार असून विदर्भातील एकात्मिक विकासाला यामुळे गती मिळणार आहे

नागपूर गडचिरोली: गडचिरोली हा जिल्हा विकसित व्हावा यासाठी हा महामार्ग तयार करण्यात आलेला आहे तसेच नागपूर ते गडचिरोली हा प्रवास देखील गतिमान होईल

गोंदिया गडचिरोली महामार्ग :गोंदिया आणि गडचिरोली हे विदर्भातील प्रमुख शहरे आहेत गोंदिया आणि गडचिरोली एकमेकांना कनेक्ट होण्यासाठी हा महामार्ग सुरू करण्यात आलेला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *