शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! आठ फळपिकांसाठी विमा योजना लागू होणार …

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! आठ फळपिकांसाठी विमा योजना लागू होणार .

फळपीक विमा योजना २०२३-२४ डाळिंब, चिकू, संत्रा, लिंबू , मोसंबी, द्राक्षे , पेरू ,सीताफळ , या आठ पिकांना फळपीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. कृषी विभागाच्या वतीने या योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.

ही योजना हवामानामुळे किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास संरक्षण देण्यासाठी सरकारने राबवलेली आहे. सरकारने या सूचित केलेल्या फळपिकांसाठीच या योजनेचा लाभ घेता येणार आहे . ज्या फळबागातून उत्पादन निघते त्यांनाच ही योजना लागू होणार आहे.

डाळिंब फळ पिकाची 14 जुलै पर्यंत अंतिम तारीख.

आंबेगाव ,जुन्नर ,पुरंदर, हवेली ,शिरूर, खेड, दौंड, बारामती ,या तालुकामध्ये फळपिकांसाठीची शेवटची मुदत १४ जुलै आहे. यासाठी एक लाख तीस हजार रुपये विमा संरक्षित रक्कम आहे . तसेच शेतकऱ्यांनी विमा भरायच्या हप्ताची रक्कम सहा हजार पाचशे रुपये आहे.

पेरू पिकासाठी 14 जून अंतिम तारीख आहे.

खेड ,हवेली,बारामती ,शिरूर ,दौंड ,भोर, या तालुक्यामध्ये पेरू फळपिकासाठी 14 जून ही शेवटची तारीख आहे . यासाठी विमा संरक्षित रक्कम ६० हजार रुपये आहे. तर शेतकऱ्यांनी विमा हफ्ता भरण्याची रक्कम तीन हजार रुपये आहे.

चिकू फळपिकासाठी अंतिम तारीख 30 जून आहे.

बारामती, जुन्नर ,दौंड ,आंबेगाव, इंदोर, भोर ,शिरूर, या तालुक्यामध्ये चिकू फळ पिकासाठी ची अंतिम तारीख की 30 जून आहे. त्यासाठी साठ हजार रुपये विमा संरक्षित रक्कम असून शेतकऱ्यांनी विमा हप्त्याची रक्कम  १३ हजार २०० रुपये इतकी आहे.

लिंबू – संत्रा पिकांसाठीची अंतिम तारीख 14 जून आहे.

शिरूर ,दौंड ,बारामती, इंदापूर, या तालुक्यातील लिंबू आणि संत्रा पिकांची अंतिम तारीख 14 जून असून 70 हजार रुपये इतका विमा संरक्षित रक्कम असून शेतकऱ्यांनी भरावयाची विम्याची रक्कम ही चार हजार पाचशे पन्नास रुपये इतकी आहे . तसेच संत्र्यांसाठी 14 जून शेवटची तारीख असून विमा संरक्षित रक्कम 80 हजार रुपये इतकी आहे . तसेच शेतकऱ्यांसाठी विमा हप्त्याची रक्कम 6000 इतकी आहे.

मोसंबीसाठीची अंतिम तारीख 30 जून आहे.

शिरूर , इंदापूर या तालुक्यातील मोसंबी या फळ पिकासाठी ची अंतिम तारीख 30 जून असून त्यासाठी ८० हजार रुपये इतकी विमा संरक्षित रक्कम आहे . तसेच चार हजार रुपये इतकी विमा हप्त्याची रक्कम आहे.

सिताफळ पिक विमा ची अंतिम तारीख 31 जुलै आहे.

इंदापूर ,जुन्नर, पुरंदर ,भोर ,शिरूर, दौंड ,आंबेगाव, खेड ,या जिल्ह्यामधील सीताफळ पिकासाठी ची अंतिम मुदत ही 31 जुलै असून त्यासाठी 55 हजार रुपये विमा संरक्षित रक्कम आहे . तसेच शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा रक्कम 6325 रुपये इतकी आहे.

द्राक्ष पिकासाठी ची अंतिम मुदत ही 14 जून आहे.

बारामती ,इंदापूर ,तालुक्यामधील द्राक्ष पिकासाठी ची अंतिम मुदत 14 जून असून त्यासाठी तीन लाख वीस हजार इतका विमा संरक्षित रक्कम 16000 इतकी आहे .शेतकऱ्यांनी आणखीन माहितीसाठी नोंदणी भारतीय कृषी विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांक १८०० ४१९ ५००४, ई-मेल आयडी pikvima@aicofindia.com , दूरध्वनी क्रमांक ०२२-६१७१०९१२ वर संपर्क साधावा. ज्यांचे अधिसूचित क्षेत्र आहे अशा शेतकऱ्यांनी या योजनेत जास्तीत जास्त सहभागी व्हावे. अधिक माहिती पाहिजे असल्यास कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

Leave a Reply