मान्सूनने ने मध्य अरबी समुद्र, दक्षिण अरबी समुद्र केरळचा बहुतांश भाग संपूर्ण लक्षद्वीप बेट, मनारचा काही भाग तसेच कोमोरिनचा भाग व्यापला आहे. सहा दिवसापूर्वी थपकलेल्या मान्सून ने पुन्हा प्रगती केली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार मान्सून गुरुवारी केरळ मध्ये दाखल झाल्याचे सांगितले आहे.
सहा दिवस एका जागेवर असलेला मान्सून ने देशात प्रवेश केला आहे. भारतीय हवामान अंदाजानुसार मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. तसेच दक्षिणेमधील आणि भागात पावसाला सुरुवात झाली आहे.
तमिळनाडू केरळ अशा अनेक भागांमध्ये मान्सून ने हजेरी लावलेली आहे. आणखीन दोन दिवसात अजून प्रगती करेल असे हवामान अंदाजानुसार जाहीर झाले आहे. देशात मान्सून दाखल होण्यास आठ दिवस उशीर झालेला आहे . एक जूनला मान्सून केरळमध्ये दाखल होत असतो परंतु यंदा तो चार जूनला देशात येईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता परंतु बिपरजाॅय चक्रीवादळामुळे मान्सूनची स्थिती थबकली होती .
चक्रीवादळ पुढे सरकल्यामुळे मान्सूने केरळमध्ये प्रवेश केला असून मान्सूनची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे . ईशान्य अरबी समुद्रावर 24 तासांमध्ये ढगांची रेलचेल वाढली आहे. पश्चिमेकडून साडेचार किलोमीटर उंचीवरून वारे वाहत आहे केरळमध्ये मागील 24 तासांमध्ये पाऊस पडत आहे. त्यामुळे हवामान अंदाज नुसार मान्सून केरळमध्ये दाखल झाला असल्याचे सांगितले आहे.
या भागात पोहोचले मान्सून
अरबी समुद्र , मध्य अरबी समुद्र, केरळचा काही भाग ,कोमोरीनचा उर्वरित भाग, ईशान्य बंगालचा उपसागर या भागात प्रगती केली आहे असे हवामान अंदाजाने वर्तवलेले आहे.
पुढील दोन दिवसात आणखीन प्रगती करणार . मान्सून आज केरळमध्ये दाखल झाला असून तमिळनाडूमध्ये देखील मान्सूनने हजेरी लावली आहे . पुढील ४८ तासांमध्ये अरबी समुद्रात देखील प्रगती करण्याची अनुकूल परिस्थिती आहे. तसेच उर्वरित कर्नाटकाचा काही भाग, तमिळनाडूचा काही भाग, आणि बंगालच्या ईशान्य भागात माॅन्सून पुढील दोन दिवसांमध्ये प्रगती करण्यास पोषक वातावरण आहे, असेही हवामान विभागाने जाहीर केले.