15012 या उसाच्या वाणाला तुरा आणि पांगशा फुटल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम,वाचा सविस्तर

महाराष्ट्रातील पाडेगाव संशोधन केंद्राच्यावतीने  कृषी विद्यापीठामार्फत  पीडीएन १५०१२  ही नवीन उसाची जात मागील वर्षीपासून सुरू करण्यात आली आहे.  ही  उसाची जात चांगली असल्याने संशोधनातून निष्पन्न झाल्याने गतवर्षी अनेक शेतकऱ्यांनी या नवीन बियाणांचा वापर बियाणे निर्मितीसाठी केला.  परंतु या बियाणं बाबत आता संभ्रमण निर्माण झाला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील बहिरेश्वर तालुका करवीर येथे उसाच्या नवीन  १५०१२ या बियाण्याला तुरा आणि पांगशा फुटला आहे.  त्यामुळे ऊसाच्या नवीन बियाणाबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रमण निर्माण झालं असून कृषी विद्यापीठाने मात्र वातावरणातील बदलामुळे तुरा येऊन नत्राचे प्रमाण जास्त झाल्याचा दावा केला आहे.

सध्या  ८६०३२ आणि २६५ या दोन  वाणांसोबत शेतकऱ्यांना नवीन काहीतरी देण्याच्या उद्देशाने सर्व ठिकाणी चांगल्या पद्धतीने ऊस यावा  यासाठी पाडेगाव संशोधन केंद्राने हे  बियाणे विकसित केले आहे.  यामुळे गत हंगामात आणि यावर्षी हंगामात शेकडो शेतकऱ्यांनी  १५०१२ या बियाण्याचे बियाणे तयार करण्यासाठी वापर केला.  परंतु कोल्हापूर जिल्ह्यातील बहिरेश्वर तालुका करवीर येथे पांडुरंग दिंडे या शेतकऱ्याने चार गुंठ्यांत बियाणे तयार करण्यासाठी १५०१२ या वाणाचा प्लॉट केला आहे.  चांगल्या पद्धतीने ऊसाची वाढ झाली परंतु वर्ष पूर्ण होण्याआधी आणि बियाण्यांसाठी ऊस तोडण्याच्या आधी बहुतांश उसाला तुरा आला आहे.  अनेक उसाला पांगशा फुटला आहे.

कुडित्रेत अरविंद नामदेव शेलार यांनी पाच गुंठ्यात या बियाण्यांचा प्लॉट केला असून , या उसाच्या बियाण्याला तुरा आला आहे,   परंतु त्यांनी हे बियाणे वाढविणार असल्याचे सांगितले असून यावेळी शेतकरी रघुनाथ बचाटे, बाबसो पाटील घटनास्थळी उपस्थित होते. उसाच्या नवीन १५०१२ बियाणाला  तुरा आला आणि पांगशा फुटल्या ही व्हरायटी लवकर पक्व होणार असल्याचे शेतकऱ्यांमध्ये याबाबत चर्चा होती. त्यामुळे आडसाली आणि पूर्वहंगामीसाठी  वापरावी का नको असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्याचबरोबर कृषी तज्ञ विद्यासागर म्हणाले की, वातावरणातील बदलामुळे तुरा आला आहे.  नत्राची मात्रा जास्त दिल्यामुळे पांगशा फुटला आहे.  खतांचा शेवटचा डोस जास्त प्रमाणात पडला असेल पुढे दीड महिन्यापर्यंत वजनात घट येणार नाही.

वजन चांगले उत्पादन कमी

बियाण्यांत २६५ ऊस व ८६०३२  क्रॉस, एकत्र केला आहे. २६५ या जातीचे उसाचे बियाणे चांगल्या पद्धतीने येते, मात्र या उसाला वजन चांगले येते; मात्र साखर कमी पडते, अशी कारखानदारांची तक्रार आहे.

Leave a Reply