Cotton prices : कापसाचे भाव थांबले, अळीचा प्रादुर्भाव वाढला – शेतकरी अडचणीत..

Cotton prices : नुकताच देशातील यंदाचा मॉन्सून अंदाज जाहीर झाला असून त्यानुसार मराठवाडा आणि मध्यमहाराष्ट्रात यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता सांगितली आहे. शेजारी असलेल्या तेलंगाणा आणि आंध्र या कपाशीच्या पट्ट्यातही यंदा चांगला पाऊस असणार आहे. त्यामुळे एकीकडे कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये उत्साह असला, तरीही दुसरीकडे गुलाबी बोंडअळीचा वाढणारा प्रादुर्भाव शेतकऱ्यांना त्रासदायक ठरत असून त्यांचे उत्पन्नही घटताना […]

Agricultural irrigation : राज्यातील कृषी सिंचनाला मिळणार बळकटी; जलसंपदा विभागाने घेतला असा निर्णय…

Agricultural irrigation

Agricultural irrigation : शेती ही आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि पाणी हे शेतीचे सर्वात मूलभूत आणि अमूल्य घटक. परंतु गेल्या काही वर्षांत बदलत्या हवामानामुळे सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता कमी होत चालली आहे. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना शाश्वत सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जलसंपदा विभागामार्फत १५ ते ३० एप्रिल या कालावधीत जलव्यवस्थापन कृती पंधरवडा राबवला जात आहे. या […]

Ladki bahin scheme : लाडक्या बहिणींना आता ५०० रुपयेच मिळणार; राज्य सरकारने घेतला असा निर्णय..

Ladki bahin scheme : राज्यात महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेत सरकारने काही महत्त्वाचे बदल केले आहेत. योजनेचा उद्देश म्हणजे राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना दरमहा आर्थिक मदत करून त्यांच्या गरजा भागवण्यास हातभार लावणे. याअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जात होते. मात्र एप्रिल २०२५ पासून या योजनेतील काही लाभार्थ्यांना पूर्ण रक्कम […]

farmers impact : ग्रामीण भागातील चलनवाढ दरात घट; शेतकऱ्यांवर काय परिणाम होणार?

farmers impact

farmers impact : मार्च 2025 मध्ये देशातील ग्रामीण भागातील ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) वर आधारित प्रमुख चलनवाढ दर 3.25% इतका नोंदवला गेला आहे, जो फेब्रुवारी महिन्याच्या 3.79% दरापेक्षा कमी आहे. खाद्यान्न चलनवाढ दर (CFPI) देखील फेब्रुवारीतील 4.06% वरून मार्चमध्ये 2.82% इतका घटला आहे. ही घट शेती, शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी काही प्रमाणात दिलासा देणारी ठरू […]

Mobile cooling unit : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणारी मोबाईल कुलिंग युनिट काय आहे?

Mobile cooling unit : शेतमाल ताजा आणि टिकवून ठेवण्यासाठी छोटे मोबाईल कुलिंग प्रणाली अर्थातच स्टोरेज अत्यंत प्रभावी ठरत असून झारखंडमध्ये त्याचा प्रयोग उपयोगी ठरला आहे. झारखंडमधील महिलांसाठी मोबाईल कुलिंग प्रणाली एक महत्त्वपूर्ण सुधारणा ठरत आहे. या यंत्रामुळे महिलांना आपल्या शेतमालाला ताजं ठेवण्याची आणि त्याला अधिक चांगल्या किमतीला विकण्याची संधी मिळते. महिलांना शेतमाल विकताना ताजेपण टिकवून […]

Onion arrival : देशभरातील कांदा आवक वाढली; महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि गुजरात आघाडीवर…

Onion arrival : देशभरात एप्रिल महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात म्हणजे १ एप्रिल ते १५ एप्रिल या कालावधीत कांदा आवकेमध्ये मोठी वाढ झाली आहे. एप्रिल २०२४ मध्ये देशभरातील एकूण कांदा आवक ४,७७,३९२.७० टन होती, तर यंदा एप्रिल २०२५ मध्ये ही आवक ७,१२,२५०.४४ टनांवर पोहोचली. याचा अर्थ देशभरात यंदा एप्रिल महिन्यातील कांदा आवक सुमारे २,३४,८५७.७४ टनांनी वाढली आहे. […]