banana & mangoes : केळी बागेत पाणी नियोजनाचे आव्हान; आंब्याचीही अशी घ्या काळजी…

banana & mangoes : तापमान वाढल्यामुळे केळीच्या बागेत योग्य पाणी देणे अत्यंत गरजेचे झाले आहे. सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उष्णता कमी झाल्यावरच सरी–वरंबा पद्धतीने पाणी द्यावे, असे वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा समितीने सांगितले. केळीचे घड भरलेल्या झाडांना काठीने आधार देऊन उभारणी मजबूत करावी. काढणीस तयार झालेले घड शक्य […]
Agricultural University : मराठवाडा कृषि विद्यापीठात ५७ शिक्षकांना पदोन्नती…

Agricultural University : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात कारकीर्द प्रगती योजना अंतर्गत एकूण ५७ शिक्षकांना उच्च शैक्षणिक वेतनश्रेणी आणि शैक्षणिक स्तरावर पदोन्नती देण्यात आली आहे. अध्यापन, संशोधन आणि विविध शैक्षणिक उपक्रमांतील सातत्यपूर्ण योगदानाच्या आधारे ही पदोन्नती मिळाली असून, विद्यापीठात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. ही प्रक्रिया कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या नेतृत्वाखाली आणि कुलसचिव […]
vine vegetables : उन्हाळ्यात वेलवर्गीय भाजीपाल्याची अशी घ्या काळजी…

vine vegetables : सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढत असल्याने वेलवर्गीय भाजीपाला पिकांमध्ये रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजीपूर्वक निरीक्षण करून वेळेत प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, असा सल्ला महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या ग्रामीण कृषि मौसम सेवा केंद्र, इगतपुरी यांनी दिला आहे. वेलवर्गीय भाजीपाला पिकांमध्ये सध्या काळा करपा व केवडा या बुरशीजन्य रोगांचा धोका अधिक […]
Animals heatstroke symptoms : सावधान ! तुमच्या जनावरांमध्ये उष्माघाताची ही लक्षणे तर दिसत नाहीत ना ?

Animals heatstroke symptoms : राज्यात उन्हाची तीव्रता वाढत असताना आता जनावरांवरही उष्माघाताचे संकट गडद होत आहे. एप्रिल महिन्यात तापमान ४२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याचा अंदाज असल्यामुळे जनावरांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. उष्माघात म्हणजे शरीरातील तापमान नियंत्रित करण्याची क्षमता कमी होणे. यामुळे जनावरांचे आरोग्य झपाट्याने बिघडते. योग्य वेळी लक्ष न दिल्यास जीवावर बेतण्याचीही शक्यता असते. उष्माघात […]
Kanda Exporter : कांदा आणि शेतमालाचे निर्यातदार व्हायचंय? मग हे कराच…

Kanda Exporter : कांद्यासह अनेकदा भाजीपाला आणि फळांचे दर पडतात. बऱ्याचदा हे भाव निर्यातीवरही अवलंबून असतात. शेतकरी किंवा शेतकऱ्यांच्या मुलांना निर्यातदार होण्याची संधी आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी आता केवळ स्थानिक बाजारापुरते मर्यादित न राहता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा मार्ग निवडावा, यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ (एमएसएएमबी) मदत करत आहे. भाजीपाला, फळे, प्रक्रिया केलेली उत्पादने यांची निर्यात करून […]